हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शिरसमणीत शेतमजुर जखमी 

संजय पाटील
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पारोळा : शिरसमणी (ता.पारोळा) येथे हिंस्र प्राण्याच्या   हल्यात नाईट्या झिनला बारेला(वय 42) हा शेतमजुर गंभीर जखमी झाला.ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.जखमीवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पारोळा : शिरसमणी (ता.पारोळा) येथे हिंस्र प्राण्याच्या   हल्यात नाईट्या झिनला बारेला(वय 42) हा शेतमजुर गंभीर जखमी झाला.ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.जखमीवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाईट्या बारेेला हा सुभाष रामराव पाटील यांच्याकडे कामाला असुन सुधाकर नगर येथील भिका शंकर पाटील यांच्या शेतात आज सकाळी तो कापुस वेचणी करित होतो.यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला.यावेळी त्याचासोबत कैलास मुंगा बारेला,बबलु मालसिंग बारेला,धरमसिंग बेस्ता बारेला हेही कापुस वेचणी करित होते.त्याठिकाणी अचानक बिबट्याने नाईट्या बारेलावर हल्ला केला असता.नाईट्याने बिबट्यास जोरदार धडक दिली.यावेळी नाईट्या सोबत पाळीव कुत्रा होतो.आपल्या मालकावर बिबट्या हल्ला करित असल्याचे लक्षात येताच कुत्राने हिंस्र प्राण्यावर प्रतिहल्ला केला. परंतु बिबट्याने कुत्रा वर हल्ला करित कुत्राचा फडशा पाडला.यावेळी नाईट्या बारेला व त्या सोबतीचे शेतकरी यांनी धाव घेत आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.सदर घटनेची माहीती नागरिकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी जखमी नाईट्या बारेला यास बाळु  रामराव पाटील,श्रीकृष्ण भिका पाटील,मन्साराम काहीरा पावरा यांनी उपचारासाठी कुटीर रुग्नालय येथे दाखल केले.यावेळी डाँक्टरांनी उपचार केले

Web Title: marathi news parola animal attack farmer injured