मुलाचा साखरपुडा करून घरीही नाही गेले तोच... 

car accident
car accident

पारोळा ः राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका रोजच सुरू आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कुटूंब उद्धवस्त होत आहेत. असाच अनुभव पुन्हा एकदा आज सायंकाळी झालेल्या अपघाताने समोर आला. मुलाचा साखरपुडा करून आनंदाने सारा परिवार घरी जात असताना रस्त्यावरच चौधरी कुटूंबावर काळाने घाला घातला. 
विचखेडे गावाजवळ भरधाव कार एसटी बसवर समोरून धडकून झालेल्या अपघातात कारमधील तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. तर बसमधील प्रवाशी सौरभ प्रविण पाटील (रा.उंदीरखेडे ता,पारोळा) हा देखील अपघातात जखमी झाल्याची घटना आज रात्री साडेसातच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले चौधरी कुटुंबीय हे धुळे येथील रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार ते पाचोरा येथे संजय चौधरी यांचा चिरंजीव विनय चौधरी याचा साखरपुडाचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. 

तिघांचा जागीच मृत्यू 
बसला कारने समोरून दिलेल्या धडकेत संजय नारायण चौधरी (वय 56), सरला रवींद्र चौधरी (वय 45) आणि मिनल संजय चौधरी (वय 23, तिघे रा. धुळे) अशी या अपघातात ठार झाले आहेत. तर नीता संजय चौधरी (वय 47), रविंद्र नारायण चौधरी ( 69) आणि विवान चौधरी (वय 5 तिघे रा. धुळे) तर सौरभ पाटील अशी जखमींची नावे आहेत. चौधरी कुटुंबीय (एम. एच. 18 बी. सी. 0575) क्रमांकाच्या कारने घरी परत येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विचखेडे गावाजवळ त्यांची कार धुळ्याकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या शिर्डी- भुसावळ या एसटी बसवर (एम. एच. 20, 3943) आदळली. अपघातानंतर विचखेडे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात हलवले. 

मुलगा स्वप्नात 
विवाह जुळल्याने त्यापुर्वी साखरपुड्याचा कार्यक्रम आज झाला. या कार्यक्रमानंतर मुलगा आणि मुलगी आपल्या आयुष्याची स्वप्न रंगविण्यास सुरवात करतात. साखरपुडा झाल्याने असेच स्वप्न रंगवत मुलगा घरी परतत असताना अचानक घडलेल्या अपघाताने सारे उद्‌ध्वस्त झाले. 

अनेकांचे मदतीला हात 
अपघात इतका भीषण होता, की कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. बसचेही समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचा चालक जागीच ठार झाला. तो कारच्या पत्र्यात अडकला होता. पारोळा येथून क्रेन मागवून कारमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी जखमींना ईश्वर ठाकुर, शरद पाटील, दिपक सोनार, मयुर महाजन, प्रसाद राजहंस यांचेसह शहरातील युवकांनी आणले. यावेळी डॉ. योगेश साळुंखे, सरला पवार, सोनाली गुरव, मंगला त्रिवेणी, शोभा बोरसे यांनी जखमींवर उपचार केले. तर अनिल चौधरी, नगरसेवक कैलास चौधरी, भैय्या चौधरी, अशोक चौधरी, अमृत चौधरी, छोटु चौधरी, संजय चौधरी, रितेश चौधरी, सोनु चौधरी, संजय मराठे, यश ठाकुर, आकाश चौधरी, जितु वानखेडे, समाधान धनगर यांनी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com