पावणे तीन लाखांचा पक्ष निधी, कॉंग्रेस वगळता सर्वचं नगरसेवकांच्या मानधनातून कपात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नाशिक : नगरसेवक हे पद खरोखरचं सेवा करण्यासाठीचं आहे याचा अनुभव पालिकेतील नगरसेवक घेत आहे. त्याला कारण म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात अंदाजपत्रका पलिकडचे कामे तर होणार नाहीचं त्याशिवाय ड्रेनेज, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा व आवशक्‍य असेल तेथेचं रस्ते या कामांव्यतिरिक्त अन्य कामे करता येणार नाही. त्यात आणखी एका कर्तव्याची भर पडली असून नगरसेवकांना मिळणाऱ्या मासिक मानधनातील काही हिस्सा थेट महापालिकेकडून पक्ष निधी म्हणून वर्ग केला जात असल्याने पक्ष वाढीसाठी सुध्दा नगरसेवकांना आर्थिक स्वरुपात योगदान द्यावे लागतं आहे. 

     गेल्या वर्षापर्यंत महापालिकेतील नगरसेवकांना साडे सात हजार रुपये मासिक मानधन मिळतं होते. राज्य सरकारने नगरसेवकांना लोकांपर्यंत जावे लागते त्या शिवाय स्टेशनरी व अन्य खर्च करावा लागतं असल्याने मासिक मानधन साडे सात हजारांवरून पंधरा हजार रुपये केले. या पंधरा हजार रुपयांमधून नगरसेवकांना काही हिस्सा पार्टी फंड म्हणून अदा करावा लागतो. पक्ष निधी देणाऱ्यांमध्ये पालिका सभागृहात सर्वात छोटा पक्ष असलेल्या मनसेकडून सर्वाधिक मानधन जाते. पंधरा हजार रुपयांमधून मनसेच्या नगरसेवकांमार्फत प्रत्येकी चार हजार रुपये पक्ष निधी म्हणून मनधन वर्ग होते. त्याखालोखाल शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकांच्या मानधनातून तीन हजार रुपये निधी कपात होते.

  महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप नगरसेवकांच्या मानधनातून दोन हजार रुपये प्रत्येकी तर तितकेच राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवकांच्या मानधनातून कपात होतात. कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या मानधनातून कपात केली जात नाही. राजकीय पक्षांचा निधी परस्पर कपात करून त्या पक्षांच्या बॅंक खात्यात टाकता येतात का? यावर नगरसचिव विभागाकडून त्या पक्षांच्या गटनेत्यांनी पत्र दिल्याने निधी कपात होत असल्याचे सांगितले. 

राजकीय पक्षांना मिळणारा फंड 
भाजपचे 66 निवडून आलेले तर तीन स्विकृत सदस्य असे 69 नगरसेवकांचे एक लाख 38 हजार रुपये पक्षनिधी कपात होतो. शिवसेनेचे 35 निवडून आलेले तर दोन स्विकृत सदस्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एक लाख अकरा हजार रुपये पक्षनिधी मानधनातून कपात होतात. मनसेच्या पाच नगरसेवकांचे वीस हजार रुपये तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा नगरसेवकांचे एकुण बारा हजार रुपये मानधनातून कपात होतात. असे एकूण दोन लाख 81 हजार रुपये मानधनातून राजकीय पक्षांच्या खात्यात जमा होतात. नगरसेवकांना महापालिकेच्या तिजोरीतून एकुण 19 लाख पाच हजार रुपये मानधन अदा केले जाते. 
 
Web Title: marathi news party fund