पवित्र पोर्टलला शिक्षण संस्थांचा विरोध मावळला 

residentional photo
residentional photo

नाशिक : सत्तर टक्‍के संस्थांनी शासनाने मागविलेली माहिती उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित तीस टक्‍के संस्थांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भरतीवरील बंदी उठवावी, अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परीषदेत मांडली. 

पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात अनुकुलता दर्शविल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ पवित्र पोर्टल संदर्भातील विरोध मावळ्याची स्थिती आहे. 
श्री.विजय नवल पाटील म्हणाले, मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहोत. भरती राबविण्यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग खुला असला तरी असे केल्यास निकाल येईपर्यंत मोठी प्रतिक्षा करावी लागेल. त्यापेक्षा शासनाने बंदी उठवून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डिसेंबर महिन्यात महामंडळाच्या अधिवेशनात दिलेल्या निर्णयाचे पालन करावे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com