महिलेने विहिरीत उडी घेताच नागरिक धावले; मग काय सुरू झाले वाचविण्याचे प्रयत्न

भरत बागुल
Tuesday, 19 January 2021

विहिरीकडे नागरिकांनी धाव धाव घेतली.लाकडी बाजूला आणून दोर बांधून पाण्यात टाकून बुडत असलेल्या महिलेल्या वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले.

पिंपळनेर : येथील पांझरा नदीकिनारी असलेल्या सामोडे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीत एका 55 वर्षीय महिलेने विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने नागरिकांच्या सहकार्याने महिलेस बाहेर काढण्यात आले. लागलीच दवाखान्यात दाखल करून पोटातील पाणी काढल्याने महिला वाचली.
 

आवश्य वाचा- प्रचाराला गावात न फिरला..न मतदान केले; तरी 'तो' निवडणूकीत विजयी झाला, हे कसे झाले शक्य ? वाचा सविस्तर 

नागोबाई बाभुळकर (वैदू ) ह्या 18 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सामोडे ग्रामपंचायतीच्या असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत पडल्याने त्या पाण्यात गटांगळ्या खात असल्याने तेथील काही नागरिकांनी पाहिले. तत्काळ नागरिकांनी विहिरीकडे धाव घेत महिलेला वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले

विहिरीकडे नागरिकांनी धाव धाव घेतली.लाकडी बाजूला आणून दोर बांधून पाण्यात टाकून बुडत असलेल्या महिलेल्या वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. अखेर बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरानी महिलेच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढले.

वाचा- धुळ्यामधील ग्रामपंचायत निवडणूकीत तीन पक्षांचे विजयाबाबत परस्परविरोधी दावे 

 

महिला पडली की उडी घेतली ?

औषधोपचार करून वाचविण्यात यश आले आहे. पुढील उपचारासाठी महिलेचा धुळे येथे पाठवण्यात आले आहे. तिने विहिरीत का उडी घेतली ? का विहिरीत पडली हे समजू शकले नाही.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pimpalaner dhule women jumped well attempt suicide save civilians