पल्स पोलिओ मोहिमेत जिल्ह्यात सव्वादोन लाख बालकांचे लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नाशिक - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत रविवारी (ता. 11) शहरासह जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेद्वारे शहरात एक लाख 86 हजार 845, तर जिल्ह्यातील नऊ पालिका क्षेत्रांत 51 हजार 878 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. जिल्हा परिषदेंतर्गत 94 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात आले. 

नाशिक - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत रविवारी (ता. 11) शहरासह जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेद्वारे शहरात एक लाख 86 हजार 845, तर जिल्ह्यातील नऊ पालिका क्षेत्रांत 51 हजार 878 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. जिल्हा परिषदेंतर्गत 94 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे पांढुर्ली येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस पाजून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्यस्तरीय सर्वेक्षर वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर लष्करे यांच्या हस्ते, तर नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेचा प्रारंभ बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. या वेळी प्रभाग सभापती शाहीन मिर्झा, नगरसेविका अर्चना थोरात, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे उपस्थित होते. जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील अपेक्षित सात लाख 74 हजार 553 बालकांना लस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 

नाशिक महापालिका क्षेत्रातील एक लाख 86 हजार 845 पैकी एक लाख 44 हजार 675 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. जिल्ह्यात चार हजार 429 बूथ उभारण्यात आले होते. 11 हजार 966 आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले. बसस्थानक, रेल्वेस्थानक, आठवडेबाजार, यात्रा, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी 345 फिरती पथके, तर 216 मोबाईल पथके नेमण्यात आली होती. उद्या(सोमवार)पासून तीन ते पाच दिवस तीन हजार 522 पथकांद्वारे घरोघरी जाऊन वंचित बालकांना डोस पाजला जाणार आहे. 

पालिका क्षेत्रातील लसीकरण 
त्र्यंबकेश्‍वर- 1804, इगतपुरी- 3216, भगूर- 1156, देवळाली- 3844, सिन्नर- 10616, येवला- 7119, नांदगाव- 4143, मनमाड- 11101, सटाणा- 8879. 

नाशिक महापालिका क्षेत्रातील लसीकरण 
शहरी आरोग्यसेवा केंद्र : सातपूर- 4224, संजीवनगर- 5315, आरसीएच केंद्र गंगापूर- 8307, एमएचबी कॉलनी- 4668, सिडको- 4385, अंबड- 4754, मोरवाडी- 4963, कामटवाडे- 3881, पवननगर- 5003, पिंपळगाव खांब- 5349, नाशिक रोड- 5580, विहितगाव- 3805, सिन्नर फाटा- 5011, गोरेवाडी- 2775, दसक पंचक- 4971, उपनगर- 4868, बजरंगवाडी- 4729, भारतनगर- 4755, वडाळागाव- 4164, जिजामाता- 3833, मुलतानपुरा- 4725, जिल्हा शासकीय रुग्णालय- 7758, रामवाडी- 3873, रेडक्रॉस- 3714, मायको दवाखाना पंचवटी- 4984, म्हसरूळ, मखमलाबाद- 5026, तपोवन- 4623, हिरावाडी- 4810. 

जिल्ह्यातील टक्केवारी 
बागलाण 95, चांदवड 94, देवळा 100, दिंडोरी 96, इगतपुरी 97, कळवण 99, मालेगाव 92, नाशिक 98, नांदगाव 93, निफाड 93, पेठ 90, सिन्नर 96, सुरगाणा 87, त्र्यंबकेश्‍वर 94, येवला 93. 

जिल्हा परिषदेंतर्गत : 94 
नऊ नगरपालिका क्षेत्र : 100.63 

Web Title: marathi news polio nashik