दोन वर्षांच्या तुलनेत यंदा  दिवाळीत ध्वनिप्रदूषणात घट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सातपूर ः दिवाळीपूर्वी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रदूषणाबाबत जागृती केली असली तरी यंदा नाशिककरांनी स्वतःहून प्रदूषण कमी करण्याबाबत पाऊल उचलल्यामुळे गेल्या वर्षीच्या 77.7 डेसिबलच्या तुलनेत यंदा 55.1 डेसिबल एवढेच ध्वनिप्रदूषण झाल्याचा दावा मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र संगेवार व सहाय्यक प्रादेशिक अधिकारी अशोक करे यांनी केला. 

दिवाळीत आतषबाजीमुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने केलेल्या चाचणीतून दोन वर्षांचा अहवाल पाहता या वर्षी हवेचे व ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला. हवाप्रदूषणासाठी उद्योग भवन, राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, व्हीआयपी कंपनी, आरटीओ आदी ठिकाणी चाचणी घेतली. यावर्षी नागरिकांमध्ये मोठी जागृती करण्यात आली होती. त्यात प्रसारमाध्यमांबरोबर शाळा, महाविद्यालयांत प्रदूषण न करण्याची शपथ दिली होती. त्यामुळे मुलांनीही पालकांकडे फटाक्‍यांची मागणी केली नाही. तसेच हवाप्रदूषण करणाऱ्या फटाक्‍यांवरही मंडळाने दिवाळीपूर्वीच चाचणी घेऊन विक्रेत्यांना सूचना दिल्यामुळे घातक फटाके बाजारात विक्रीसाठी आले नाहीत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pollution