प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना थेट सील, न्यायालय आदेशानंतर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सातपूर ः वारंवार नोटिसांनंतरही सुधारणा न केल्याने मालेगाव येथील 129 सायजिंग व 210 प्लॅस्टिक उद्योगांना अखेर न्यायालयाने उत्पादन बंद करण्याची अंतिम नोटिसा बजावलेल्या होत्या. पण यातील शेकडो कंपन्यांनी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सर्रास अनधिकृत लाइट व पाणीजोडणी जोडून उत्पादन सुरू ठेवल्याने न्यायालयाने अखेर अशा मुजोर शेकडो कंपन्या सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मालेगावातील गोल्डन सायजिंग ही पहिली कंपनी एमपीसीबीने सील केल्याचे प्रादेशिक अधिकारी डॉ. जितेंद्र संगेवार यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. नियम तोडणाऱ्या कंपन्या सील करणार असल्याचे त्यांनी सांगितले 

मालेगाव सर्वाधिक प्रदुषित

देशातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर म्हणून मालेगाव गणले जाते. या शहरात किमान साडेतीन लाख सायजिंग उद्योग आहे, तर अडीचशे प्लॅस्टिक उद्योग आहेत. पण या व्यावसायिकांकडे उद्योग चालविण्यासाठी लागणारे विविध शासकीय खात्यांचे परवाना व इतर कागदपत्रेही पुरेसे नाहीत.

रोखणार कसे...

या उद्योगांतून निघणारे प्रदूषणयुक्त पाणी सर्रास नाल्यात सोडले जाते. हवेतही घातक घटक सोडले जात असल्याने न्यायालयाने दोन वर्षांपासून एमपीसीबीला जबाबदार धरत कारवाईचे आदेश दिले होते. गेल्या दीड वर्षात 129 सायजिंग व 210 प्लॅस्टिक कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचा नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर काही कंपन्यांनी सुधारणा करत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण 28 उद्योगांनी मात्र या नोटीसकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही.

जाणूनबुजून दुर्लक्ष

न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून अनधिकृतरित्या वीज, पाणी वापरत आपले उत्पादन सुरू ठेवले. तर प्लॅस्टिक उद्योगांनी रात्रीच्या वेळी उत्पादन सुरू केले होते. याबाबतही स्थानिक नागरिकांनी तक्रार करत हरित लवादाकडे धाव घेतली होती. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने एमपीसीबीच्या एक अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करत या कंपन्या सील करण्याचे आदेश दिले होते. नुकतीच्या कायदेशीर बाबी पूर्ण करत गोल्डन सायजिंग कंपनी कायमची सील करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सातपूर, अंबडसह इतर ठिकाणी अशा कंपन्यांना उत्पादन बंद करण्याची नोटीस देऊनही उत्पादन सुरू ठेवणाऱ्या शेकडो कंपन्यांवरही कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक अधिकारी संगेवार यांनी दिला. 

जावडेकरांकडे धाव 
या कारवाईमुळे मालेगाव येथील सायजिंग व प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले असून, या उद्योजकांनी आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या भेटीसाठी दिल्लीला धाव घेतली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pollution in nashik industrial area