पुर्व, पंचवटी, नाशिकरोड, सिडको प्रभाग सभापती बिनविरोध  सातपूर, पश्‍चिममध्ये मनसेला महत्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

नाशिक- यंदाच्या पंचवार्षिक मधील तिसऱ्या वर्षाच्या प्रभाग समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पुर्व, पंचवटी, नाशिकरोड व सिडको प्रभाग समित्यांमध्ये एकमेव अर्ज दाखल झाल्याने येथील सभापती पदाची निवडणुक बिनविरोध पार पडली आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या पुर्व विभागातून सुमन भालेराव, पंचवटी प्रभाग समिती सभापती पदासाठी सुनिता पिंगळे, नाशिकरोड प्रभाग समिती सभापती पदी विशाल संगमनेरे तर सिडको प्रभाग समिती सभापती पदी दिपक दातीर यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने बिनविरोध निवडणुक होवून सभापती पदाची घोषणा होण्याची फक्त औपचारीकता राहीली आहे. 

येत्या 5 व 6 जुलैला प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापुर्वी आज अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार भाजपच्या वतीने चार प्रभाग समित्यांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. पंचवटीतून सुनिता पिंगळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

नाशिकरोड प्रभाग समितीसाठी विशाल संगमनेरे तर पुर्व विभागातून पुन्हा एकदा सुमन भालेराव यांना सभापती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिघांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवड होणार आहे. शुक्रवारी (ता. 5) सातपूर, नाशिकरोड व सिडको तर शनिवारी (ता. 6) पश्‍चिम, पंचवटी व पुर्व प्रभाग समिती सभापती पदासाठी निवडणुक होईल. बिनविरोध होणार असल्याने येथे माघारीचा विषय संपुष्टात आला आहे. 

सातपूर, पश्‍चिम मध्ये पेच 
सातपूर प्रभाग समिती सभापती पदासाठी सातपूर विभागातून हेमलता कांडेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. येथे मनसेच्या भुमिकेवर प्रभाग समितीची सत्ता अवलंबून राहणार आहे. सातपूर विभागातील पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने बिनशर्त पाठींबा दिल्याने भाजपने युतीचा धर्म पाळावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे

 मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपने मनसेला तर यावर्षी मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याने सभापती पदासाठी उमेदवार उभे केल्याचे भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी दावा केला. पश्‍चिम प्रभाग समिती सभापती पदासाठी कॉंग्रेसच्या वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतू त्याचबरोबर मनसेच्या ऍड. वैशाली भोसले यांनी देखील अर्ज दाखल केल्याने मनसे कडून आघाडीत बिघाडी झाली आहे. दरम्यान सातपूर व पश्‍चिम या दोन्ही ठिकाणी मनसेची भुमिका महत्वाची ठरणार आहे. 

प्रभाग समिती निहाय पक्षीय बलाबल 
पक्ष पुर्व पश्‍चिम पंचवटी नाशिकरोड सिडको सातपूर 
भाजप 12 5 19 12 9 9 
शिवसेना 00 1 1 11 14 8 
कॉंग्रेस 2 4 00 00 00 00 
राष्ट्रवादी 4 1 0 00 1 00 
मनसे 00 1 2 00 00 2 
अपक्ष 1 0 2 00 00 00 
रिपाई 00 0 0 0 0 1 

एकुण 19 12 24 23 24 20 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news prabhag samitte election