राज ठाकरे यांची 16 ला  डोंगरे वसतिगृह मैदानावर सभा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या बुधवारी (ता. 16) मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहे. त्यासाठी डोंगरे वसतिगृहाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

  सभेला मैदानावर परवानगी देण्यापूर्वी महापालिकेकडे थकबाकी अदा करण्यात आल्यानंतर परवानगी देण्यात आली. मैदानावरील दोन लाख 81 हजारांची घरपट्टी व मैदानावर लावण्यात आलेल्या होर्डिंगचा सहा लाख 75 हजारांचा कर असे एकूण नऊ लाख 56 हजार रुपये अदा करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. 16 ऑक्‍टोबरला सायंकाळी सहाला ही सभा होईल. राज यांची या मैदानावरील पहिलीच सभा होणार आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raj thakreT