रामजन्मभूमी चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

जुने नाशिकः रामजन्मभूमी' या नावाचे चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे टिजर सध्या लॉंच झाले आहे. हा  चित्रपट बाबरी मस्जिद -राम जन्म भूमी या वादग्रस्त विषयावर आधारित आहे. 

जुने नाशिकः रामजन्मभूमी' या नावाचे चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे टिजर सध्या लॉंच झाले आहे. हा  चित्रपट बाबरी मस्जिद -राम जन्म भूमी या वादग्रस्त विषयावर आधारित आहे. 
चित्रपटात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे दृश्‍य चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नाशिक मुस्लिम वेल्फेअर कमिटीतर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर याना देण्यात आले आहे. चित्रपटाचे लेखक निर्माता वासिम रिझवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवेदनात केली आहे. रिजवी उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्‍फ बोर्डाचा सदस्य आहे. त्याच्याकडून हेतू पुरेस असे केले जात आहे. शहर-ए-काझी सय्यद एजाज काझी यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी आसिफ इब्राहीम शेख, असलम खान, अयाज काझी, ईसाक कुरेशी, जहीर पटेल, शोहेब शेख आदी उपस्थित होते. 

Web Title: marathi news ramjan bhumi