रामसृष्टीत उरला नाही राम

ramshrushti
ramshrushti

  तपोवनातील रामसृष्टी उद्यानात "राम' नाही उरला. मद्यपींच्या उच्छादाने तीर्थक्षेत्र पर्यटनाला ठेच लागली आहे. दुरावस्थेकडे महापालिका सोडाच पण लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. 

महापालिकेने गाजावाजा करत तीन कोटी रुपये खर्चत रामसृष्टी उद्यान उभारले. आता त्याची अवस्था पाहवत नाही. वाढलेले गवत, शिल्पांची दुरावस्था, ऍम्पी थिएटरच्या उखडलेल्या फरशा, विजेच्या उघड्या पेट्या, टवाळखोर अन्‌ मध्यपीचे अड्डे, इथल्या इमारतीमधील गैरप्रकार हे साऱ्या उघड्या डोळ्यांनी पाहताना नाशिककरांपुढे संताप करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. 

तपोवन...गोदा-कपिला संगम, श्रीराम-सीतामातेची झोपडी, शूर्पनखेचे नाक कापल्याच्या अख्यायिकेचे स्थळ, राम-लक्ष्मण मंदिर अशी कितीतरी शक्तीस्थळे भाविकांप्रमाणेच पर्यटकांना खेचून आणतात. पर्यटनाला गती मिळावी आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून महापालिकेतर्फे जवाहरलाल नेहरु पुनर्उत्थान योजनेतंर्गत रामसृष्टी उद्यान उभारण्यात आले. पर्यटनाचा नाशिककरांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प.

2012 मध्ये सर्वच नगरसेवकांनी महासभेत गाजावाजा करत हा प्रकल्प पूर्ण केला. बांधकामाची कामे संपताच अनेक प्रकल्पांसारखाच हाही दुर्लक्षित झाला. ज्येष्ठ नाटककर यांच्या नावाचे वसंत कानेटकर उद्यान, कुसुमाग्रज उद्यान, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक, पेलिकन पार्क, ट्रक टर्मिनल अशाच दुर्लक्षित प्रकल्पात आता रामसृष्टी उद्यानाची भर पडली आहे. 

देशभरातूनच नव्हे, तर सातासमुद्रापलिकडून येणाऱ्या भाविकांप्रमाणेच पर्यटकांची उद्यानाच्या दुरावस्थेवर नजर पडता क्षणी वाईट प्रतिमा तयार होते. उद्यानात दारुडे, गंजड्यांनी तांबा घेतलाय. वृक्षांखाली बिनदक्कपणे बिबत्स चाळे चाललेले असतात. त्यातच भर म्हणजे, कारंजा बंद पडलाय. झोपड्या बांधण्याकडे कानाडोळा केला गेलाय. उद्यानात सर्वच बाजूने प्रवेश करता येत असताना सुरक्षा रक्षक नसल्याने हे उद्यान गैरप्रकारांचे केंद्र बनले आहे. 
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com