नगरसेवकांनी स्वखर्चाने भरले रस्त्यातील खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

रावेर : येथील जूना सावदा रोडवरील पालिका हद्दीबाहेरील खड्डे नगरसेवकांनी लोकांच्या मागणीवरून स्वखर्चाने खडी आणून भरले. 

रावेर : येथील जूना सावदा रोडवरील पालिका हद्दीबाहेरील खड्डे नगरसेवकांनी लोकांच्या मागणीवरून स्वखर्चाने खडी आणून भरले. 
या रस्त्यावरील पुलाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. तेथून वाहने नेणे म्हणजे एक कसरतच होती. त्यामुळे लोकांना खुप त्रास सहन करावा लागत होता. येथील नगरसेवक सुधीर पाटील आणि सुरज चौधरी यांनी लोकांच्या तक्रारीची दखल घेत त्वरित ते खड्डे मुरुम आणून स्वतः उभे राहून स्वखर्चाने भरून घेतले. या भागातील गटारीचे पाणी रोडवर येत होते. जेसीबी मशीनद्वारे चारी करून ते सांडपाणी पुढे असलेल्या नाल्यात सोडण्यात आले. नितिन पाटील, संजय पाटील, राजू जैसवाल यांनी ही स्वतः आमच्या सोबत उभे राहून सहकार्य केले. 

तर...खड्डे स्वतः बुजविणार..
रावेर-उटखेडा रस्त्याचे काम सोमवारी एक जुलैपासून सुरु होणार असे आश्वासन अधिकाऱ्यांनी देऊनही आठ दिवसात हे काम सुरू झालेले नाही. यामुळे सोमवार (ता.9) पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास सोमवारी दुपारपासूनच आपण स्वतः स्वखर्चाने तेथील खड्डे बुजवण्याचे काम करणार असल्याचे नगरसेवक ऍड. सुरज चौधरी यांनी सांगितले.

Web Title: marathi news raver nagarsevak road