कॉग्रेसच्या संघर्ष यात्रांच्या ठिकाणी भाजपलाच सत्ता ः रावसाहेब दानवे

live
live



नाशिक ः इंधन दरवाढ हे कॉग्रेस पक्षाचे अपत्य आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधातील संघर्ष यात्रेचा काही उपयोग नाही. उलट यापूर्वी "चांदा ते बांदा ही संर्घष यात्रे ज्या-ज्या ठिकाणाहून निघाली तेथे भाजपला राज्यभर सत्ता मिळत गेली. अशा अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉग्रेस पक्षाच्या संर्घष यात्रेची खिल्ली उडवली. 

खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने श्री दानवे यांच्यासह भाजप नेते नाशिकला आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलतांना श्री दानवे यांनी कॉग्रेस व आघाडी सरकारवर टिका केली.

ते म्हणाले, श्री दानवे म्हणाले, कॉग्रेसच्या काळात इंधनाचे दरवाढ आंतरराष्ट्रीय दराशी जोडले गेले. तेव्हापासून त्यावर जागतिक दराचा प्रभाव राहिला आहे. कॉग्रेसने हे दर जोडल्यामुळेच इंधन दरवाढीचा सामान्यांना सामना करावा लागतो आहे. मात्र अशाही स्थितीत, इंधनाचा समावेश जीएसटी करण्याच्या अनुषंगाने विविध राज्याच्या मुख्यमंत्र्याची लवकरच बैठक घेतली जाईल. यापूर्वीही कॉग्रेसने "चांदा ते बांदा संर्घष यात्रा' काढली होती. पनवेलपर्यत निघालेल्या कॉग्रेसची संघर्ष यात्रा ज्या ज्या भागातून गेली. त्या-त्या ठिकाणी झालेल्या निवडणूकीत भाजपचा विजय होउन सत्ता मिळाली आहे. 

राफेल कॉग्रेसवर बुमरॅंग.... 
राफेल विमान खरेदीच्या अनुषंगाने देशभर कॉग्रेसकडून सुरु असलेल्या हल्ला-बोल विषयी श्री दानवे यांनी, विरोधकांचे ते कामच आहे. भाजपच्या 4 वर्षाच्या काळात त्यांना कुठलीही आरोपाची संधीच न मिळाल्याने बातम्यांच्या रुपाने चर्चेत राहण्यासाठी कॉग्रेसला तेवढ करावेच लागते आहे. फ्रान्सच्या राफेल विमानाच्या खरेदी व्यवहारात आमचे (भाजपचे) कुणी सापडणार नाही. चौकशी झालीच तर कॉग्रेसचे लोक असतील.असा दावाही केला. 

युतीच्या बैठका.... 
भारीप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्या युतीची श्री दानवे यांनी "अशा खूप युत्या-आघाड्या होतात. त्याचा काही फरक पडत नाही. अशा शब्दात खिल्ली उडवली. पण त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीबाबत मात्र लवकरच दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com