महसूलच्या 80 टक्के कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपात सहभाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नाशिकः राज्यातील महसूल आधिकारी-कर्मचारी आज गुरुवारी (ता.5)पासून बेमुदत संपावर गेले आहे. नाशिक जिल्ह्यात महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाला 80 टक्‍क्‍याहुन अधिक प्रतिसाद मिळाला आहे. पाचव्या टप्प्यातील आंदोलनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे. विविध संघटनांनी बेमुदत संपाला पाठिंला दिला आहे. 
   
शासनाने तत्वत: मान्य केलेल्या मागण्यांबाबत 6 वर्षानंतरही शासन निर्णय न काढल्याने 11 जुलैपासून राज्यात टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने यापुर्वीच्या 4 टप्यात, व्दारसभा, निदर्शने, घंटानाद, ऑगस्ट क्रांती दिनी 1 तास जादा काम करुन शासनाचे लक्ष वेधले. 28 ऑगस्टला एक दिवस सामुदायिक रजा आंदोलन केले. मात्र त्यानंतरही शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने 31 ऑगस्टला राज्यात महसुल कर्मचारी यांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करतांना रक्तदान करून शासनाचा निषेध नोंदवला.

राज्यातील जवळपास 3000 पेक्षा जास्त पिशव्या रक्तदान महसुल कर्मचारी यांनी सरकारी रक्तपेढीत जमा करुन शासनाचा निषेध केला. मात्र त्यानंतरही बुधवारी (ता.4) सप्टेंबला मुंबईत झालेल्या चर्चेत महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय होउ न शकल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आज गुरुवार (ता.5) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news revenu worker strike