तांदूळ उद्योगही मंदीने करपला, खप निम्म्यावर

residentional photo
residentional photo

घोटी, ता. २७ : तांदळाच्या पठारावरच तांदूळ उद्योगाला मंदीचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत कामगार कपातीची गंभीर वेळ येवून तांदूळाचा खप निम्म्यावर आल्याने वाढत्या स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तांदूळ प्रक्रिया उद्योग व्यावसाहीकांनी सकाळ’कडे मांडले आहे.

तांदूळ उत्पादनात कच्च्या मालाची आवक कमी झाली आहे. बाजार पेठेत पक्क्या मालाचा उठाव कमी झाल्याने वाढत्या स्पर्धेमुळे बाजार पेठेत टिकाव लागणे कठीण झाले आहे. उत्पादनात वाढीव खर्च,कामगारांचा रोजगार,वाढीव विजेचे दर,डिझेलचे वाढलेले दर, ट्रान्सपोर्ट खर्च यात तांदूळ मिल उत्पादक व्यावसाहिक भरडला जात आहे. मंदीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी खरेदीच्या दृष्टीने शासनाने भात गिरणी उद्योगाला सबसिडी देवून प्रक्रिया मशिनरी सबसिडीच्या दरात देणे गरजेचे आहे.

विज कपात कमी करून वाढीव युनिट दर कमी करणे गरजेचे आहे.या सर्व मंदीचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसतो,शिवाय तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसला जातो. तालुक्यात ६५ तांदूळ उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या मिल आहेत.प्रत्येकी मिल मध्ये १० ते १५ कामगार यांसह भाडेतत्वार १० ते २० हमाल घ्यावे लागतात.मजुरीचा वाढलेला दर,मालाचा खप कमी यामुळे दोन शिफ मध्ये चालणाऱ्या मिल आठवड्यातून दोन किंव्हा एक दिवस चालवावी लागत आहे.नाशीक,पुणे,मुंबई बाजार पेठेत सद्यस्थितीत खप कमी होत आहे.श्रावण,गणपती,नवरात्री सणामुळे देखील विक्रीवर परिणाम होत आहे.सातत्याने बंद उद्योगामुळे कामगारांना घर खर्च चालविणे जिकिरीचे झाले आहे तर व्यवसाहीकांना बॅक कर्ज भरणे,कच्चा माल खरेदी करणे कठीण झाले आहे.  

= गुणवत्तापूर्ण तांदूळ किलोचे भाव..
कच्चा माल ८० किलो काटा –  इंद्रायणी- २२०० रुपये, गरी कोळपी -१८०० रुपये,१००८ – २००० रुपये,ओम ३ – १९०० रुपये. प्रक्रिया केलेला पक्का माल किलोचे दर - - इंद्रायणी- ४४ ते ४८ रुपये. गरी कोळपी – ३५ ते ४० रुपये. १००८  - २८ ते ३५ रुपये. ओम ३ – २२ ते ३० रुपये  

 लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष व शासनाचे कठोर नियम मंदीच्या फटक्यात कामगारांसह व्यवसाहिक हतबल झाले आहे. यामुळे दोन हजार कामगार कपात करण्याची वेळ आली आहे.

कच्च्या मालाचे वाढलेले दर,विजेचे दरवाढ,पक्का मालाचा खप कमी झाल्याने आठवड्यातून दोन एक दिवस मिल चालतात. जिल्ह्य़ात बहुसंख्य शेतकरी धान्य उत्पादक आहे. धान्य  आधारित उद्योग जिल्ह्य़ात उभे राहत नसतील आणि असलेले बंद पडत असतील तर ते जिल्ह्य़ाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.शासनाने वेळीच लक्ष घालण्याची वेळ आहे.

– नवसूलाल पिचा , अध्यक्ष राईस मिल असोसीएन घोटी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com