रिक्षा पलटी झाल्याने चिमुकली ठार, रिक्षाचालक मद्याच्या नशेत : तिघे जखमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नाशिक :  गंगापूर गावानजिकच्या कानेटकर गार्डनसमोर भरधाव वेगातील रिक्षा पलटी झाली आणि घसरत गेलेली रिक्षा समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकली. या अपघातामध्ये रिक्षातील 6 वर्षांची चिमुकली ठार झाली. तर अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य गंभीररित्या जखमी आहे  रिक्षाचालक मद्याच्या नशेमध्ये रिक्षा चालवित असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नववर्षाची पूर्वंसंध्येचा आनंद घेऊन घराकडे परतताना चौधरी कुटूंबियांचा अपघात झाला.  राशी राजेश चौधरी (6, रा. श्रमिकनगर, सावता माळी बसथांबा, सातपूर) असे चिमुकलीचे नाव आहे.

नाशिक :  गंगापूर गावानजिकच्या कानेटकर गार्डनसमोर भरधाव वेगातील रिक्षा पलटी झाली आणि घसरत गेलेली रिक्षा समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकली. या अपघातामध्ये रिक्षातील 6 वर्षांची चिमुकली ठार झाली. तर अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य गंभीररित्या जखमी आहे  रिक्षाचालक मद्याच्या नशेमध्ये रिक्षा चालवित असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नववर्षाची पूर्वंसंध्येचा आनंद घेऊन घराकडे परतताना चौधरी कुटूंबियांचा अपघात झाला.  राशी राजेश चौधरी (6, रा. श्रमिकनगर, सावता माळी बसथांबा, सातपूर) असे चिमुकलीचे नाव आहे. तर, राजेश गंगाराम चौधरी (45), रिया राजेश चौधरी आणि अडीच वर्षांचा मुलगा ऋतिक राजेश चौधरी (सर्व रा. श्रमिकनगर, सावता माळी बसथांबा, सातपूर) हे तिघे जखमी आहे.

Web Title: marathi news rickshaw accident