रिक्षाचालक निघाला अट्टल घरफोड्या, साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नाशिक : रिक्षाचालक असलेल्या संशयितासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. संशयितांकडून चोरीच्या दुचाक्‍यासह सायकली व घरफोड्यात चोरलेले होम थिएटर्स असा 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुर्गेश दिलीप गवळी (27, रा. काकड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. 
 
 गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांना एमएच 15 झेड 8169 याच रिक्षाचा चालक दुर्गेश गवळी हा घरफोडी करीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, गंगापूर पोलिसांनी संशयित रिक्षाचालक गवळी याचा शोध सुरू केला असता, काल (ता. 20) त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

संशयित गवळी हा दिवसा रिक्षा चालवायचा आणि यादरम्यान बंद घरे हेरून त्याठिकाणी रात्री दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोड्या करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

संशयितांकडून एक लॅपटॉप, 5 संगणक, 1 प्रिंटर, 5 युपीएस, 1 स्कॅनर, 2 होम थिएटर, 4 मोबाईल, एक दुचाकी, एक रिक्षा व 13 महागड्या सायकली असा 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी उपनिरीक्षक समीर वाघ, उपनिरीक्षक कोल्हे, हवालदार गायकर, उगले, गायकवाड, नितीन नेटारे, देसले, ढगे, सुपले यांच्या पथकाने बजावली. 
 
Web Title: MARATHI NEWS RICKSHAW DRIVER