अंबड, नाशिकरोडला गावठी कट्टे, काडतुसे जप्त,दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नाशिक : चुंचाळे शिवारात तीन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे जप्त केल्याची कारवाई अंबड पोलिसांनी केली . त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेनेही नाशिकरोड परिसरात एक गावडी कट्टा व 11 जिवंत काडतुसे जप्त केले. गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून मुद्देमालही हस्तगत केला आहे. 

नाशिक : चुंचाळे शिवारात तीन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे जप्त केल्याची कारवाई अंबड पोलिसांनी केली . त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेनेही नाशिकरोड परिसरात एक गावडी कट्टा व 11 जिवंत काडतुसे जप्त केले. गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून मुद्देमालही हस्तगत केला आहे. 

   चुंचाळे शिवारातील दत्तनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी संशयित आल्याची खबर अंबड पोलीसा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी (ता.23) रात्री एक पथक दत्तनगर परिसरात रवाना केले असता, एका एक्‍सयुव्ही चारचाकी वाहनात एक इसम संशयास्पदरित्या हालचाली करताना दिसला. पोलीस पथकाने संशयित मनोज मच्छिंद्र शार्दुल (25, रा. दत्तनगर, चुंचाळे, अंबड) यास ताब्यात घेत, वाहनाची आणि राहत्या घराची झडती घेतली असता, तीन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दरम्यान, पोलीस चौकशीमध्ये संशयित शार्दूल याने धुळ्यातील बाबु अग्रवाल नामक इसमाकडून सदरचे गावठी कट्टे खरेदी केल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी 1 लाख 6 हजार 500 रुपयांची तीन गावठी कट्टे व 2 हजार 750 रुपयांची 11 जिवंत काडतुसे यासह एक चाकू, लोखंडी कोयता, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 11 लाख रुपयांची एक्‍सयुव्ही चारचाकी वाहन असा 12 लाख 19 हजार 550 रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, मिथुन म्हात्रे, दत्तात्रय गवारे, अवी देवरे,आदींच्या पथकाने कामगिरी बजावली. 

गावठी कट्टयासह एकाला अटक 
    नाशिकरोड परिसरामध्ये गुन्हे शाखेची मध्यवर्ती शाखेचे पथक सोमवारी (ता.23) रात्री गस्तीवर असताना, सत्कार पॉंईट येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेला संशयित संग्राम बिंदूमाधव फडके (39, रा. शिवआराधना सोसायटी, गंधर्वनगरी, नाशिकरोड) यास अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या दोन्ही बाजुने खोवलेले दोन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना खबर मिळाल्यानंतर उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, हवालदार कर्डिले, केदार, संजय गामने, जनार्धन जाधव, दिवटे यांच्या पथकाने कारवाई केली. 
 

Web Title: MARATHI NEWS RIFLE PISTOL RECEIVED