रस्ता खोदणी,जोडणीच्या दरात मोठी छुप्पी करवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नाशिक : शहरात नवीन मिळकती, मोकळे भुखंड व शेतीवर लावण्यात आलेला कर व करयोग्य मुल्य दरातील वाढीवरून शहरभर संताप व्यक्त होत असताना महापालिकेने अन्य मार्गाने देखील छुपी करवाढ केल्याचे समोर आले आहे. यापुर्वी पाणी पुरवठा व विद्युत जोडणी करताना महापालिकेकडे रस्ता खोदाईसाठी अदा करावयाच्या दरामध्ये तब्बल चार पट वाढ करण्यात आली.

   सर्वसाधारण नवीन पाणीपुरवठा किंवा जोडणी करण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये मोजावे लागणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिडको, सातपूर या कामगार वसतीबरोबरचं गावठाण भागात प्रकर्षनाने जाणवणार आहे. 

पाणी पुरवठा, विद्युत जोडणी किंवा अन्य कारणासाठी महापालिकेचा रस्ता फोडायचा झाल्यास त्यापुर्वी पालिकेने निश्‍चित केलेल्या दरानुसार पैसे अदा करावे लागतात. पुर्वी डांबरी रस्ता फोडण्यासाठी एक हजार रुपये रनिंग मीटर दर होता. कॉन्क्रिटचा रस्ता फोडण्यासाठी बाराशे रुपये तर मातीचे रस्ते खोदायचे झाल्यास सातशे रुपये रनिंग मीटर असा दर होता. परंतू महापालिकेने एक एप्रिल पासून दरा मध्ये चौपट वाढ केल्याने पालिकेने केलेली छुपी दरवाढ आहे.

सिडको, सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. एखाद्या व्यक्तीला पाच मीटर रस्ता खोदायचा असला तरी पंचविस हजार रुपये पालिकेकडे जमा करावे लागणार आहे त्यानंतरचं रस्ता खोदता येईल. पाण्याची जोडणी घेण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येतो तर रस्ता फोडण्यासाठी पंचविस हजार रुपये खर्च येणार असल्याने घोड्यापेक्षा नाल महाग असा प्रकार मानला जात आहे. 
 
गावठाण, सिडकोत परिणाम 
गावठाण, सिडको भागात चार ते पाच मीटरचे रस्ते आहेत. येथे राहणारा वर्ग आर्थिकदृष्ट्या फारसा सक्षम नाही. नवीन नळजोडणी किंवा विद्युत जोडणी घ्यायची ठरल्यास जोडणीपेक्षा रस्ता तोडफोडीचेचं अधिक पैसे मोजावे लागणार आहे. 

महापालिकेची रोड डॅमेज फी सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरची आहे. किमान पन्नास ते साठ हजार रुपये लागणार आहे. नवीन दर लागु झाल्यापासून पाणी पुरवठा विभागाकडे नवीन कनेक्‍शनसाठी एकही अर्ज आला नाही. झोपडपट्टी किंवा गरीब लोकांना फि परवडणारी नाही.

- गणेश कांबळे, नागरिक. 

अशी आहे नवीन दरवाढ 
रस्त्याचा प्रकार दर प्रती रनिंग मीटर (रुपयात) 
रस्त्याच्या कडेला साईडपट्टीमध्ये, मुरूम, माती मध्ये खोदाई 121 
खडीच्या रस्त्यामध्ये खोदाई करणे 2040 
डांबरी रस्त्यामध्ये खोदाई करणे 4779 
कॉन्क्रिट रस्त्यामध्ये खोदाई करणे 4585 
पेव्हर ब्लॉक, फुटपाथ मध्ये खोदाई करणे 3087 

Web Title: marathi news road changeling and fancying