रोबोटिकचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

नाशिक: बहुउपयोगी रोबोटच्या बांधणीपासून तर नियंत्रण, प्रोग्रामिंगसह अन्य विविध बाबींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित व तंत्र शिक्षण आदींचा अनोखा मिलाफ करतांना हसत-खेळत मुलांना रोबोटीक्‍सचे प्रशिक्षण घेता येणार आहे. पंडीत कॉलनीतील ब्रेन स्पेस ऍकॅडमीचा मंगळवारी (ता.13) शुभारंभ झाला. याद्वारे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमास प्रवेश घेता येईल. 

या रोबोटीक सेंटरच्या उद्‌घाटनाप्रसंगी दिलीप देव, रत्नमाला देव, चंद्रकात भुतडा, पुष्पा भुतडा, मयुर धुत, स्मीता धुत, सिद्धार्थ भुतडा, मुक्‍ता देव व भुपेंद्र देव उपस्थित होते. यावेळी आलेल्या नागरीकांना रोबोटीक्‍सच्या दुनियेतील सादरीकरण करण्यात आले. रोबोटीक सेंटरमध्ये लेगो एज्युकेशन या बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपकरणांचा समावेश केला आहे. प्रि-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या वयानुसार प्रशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. यात प्रामुख्याने प्री-नर्सरी ते दुसरी, तिसरी ते सहावी आणि सातवी ते बारावी असे गट करण्यात आलेले आहे.

खेळण्यांपासून तर रोबाटच्या निर्मितीपर्यंत टप्या-टप्याने प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध असेल. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळे साहित्य उपलब्ध होणार असून वर्षभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. दरम्यान उद्‌घाटनानिमित्त रोबट पाहण्यासाठी उपलब्ध केले होते. मोबाईलच्या सहाय्याने या रोबोटची हाताळणी केली जात होती.

Web Title: marathi news robotic training