#SakalForMaharashtra  प्रश्न सोडवतांना तरूणांना केंद्रस्थानी असावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शेतीमालाला भाव देण्याचे, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रूपये जमा करण्याच्या आश्‍वासनांची तर पूर्ती झालेली नाहीच. परंतु तरूणांकरीता अपेक्षेप्रमाणे रोजगार निर्मितीदेखील झालेली दिसत नाही. देशातील मोदी सरकार अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही. उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्या तरूणांमध्ये आक्रोश, उद्रेक बाहेर येतो आहे. सामाजिक प्रश्‍न सोडवितांना तरूणांना केंद्रस्थानी ठेवणे महत्वाचे आहे. 

सामाजिक प्रश्‍नांना नुस्ती मलमपट्टी करून चालणार नाही. रोजगार निर्मितीसोबत लोकसंख्येला आळा घालणे व अन्य विविध सामाजिक प्रश्‍नांकरीता उपाय शोधण्याची ही खरी वेळ आहे. धोरणात्मक पातळीवर होणारे निर्णय रोजगार निर्मितीत अडथळे ठरता आहेत. या धर्तीवर "सकाळ माध्यम समूहा'ने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे

. समाजाने एकत्र येऊन समस्यांवर समाधान काढायचे ठरविल्यास देशाचा झपाट्याने विकास होऊ शकेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना विद्यार्थ्यांशी नेहमीच संपर्क येत असतो. त्यांच्या अपेक्षा जाणून घेतांना, त्यांच्यात कौशल्य विकास साधत रोजगारक्षम बनवतांना या उपक्रमाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे. 
-कोंडाजी मामा आव्हाड, 
अध्यक्ष, व्ही. एन. नाईक संस्था. 

Web Title: marathi news sakal for Maharashtra kondajimama avhad

टॅग्स