#SakalForMaharashtra सामाजिक परीस्थिती बदलासाठी हवी जागृकता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

     परीस्थितीनिहाय शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होता आहेत. मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना, तेव्हापासून शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देण्यास सुरवात झाली होती. सध्याच्या केंद्र सरकारने कौशल्य विकासाची प्रभावी अमलबजावणी सुरू केली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये असे अभ्यासक्रम सुरू होता आहेत. आज गरज आहे ती विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रम व कौशल्य विकासाविषयी जागृकता निर्माण करण्याची. पारंपारीक अभ्यासक्रमात शिक्षण घेतांना विद्यार्थी त्यास परदेशी भाषा, संगीतापासून तर प्लंबिंगसारखे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करू शकतात. व पदवी शिक्षण होईपर्यंत रोजगारक्षम होऊ शकतात, यात शंका नाही. 

     माध्यमांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या यशोगाथा तरूण पिढीवर प्रभाव टाकणाऱ्या असतात.. त्यातून प्रेरीत होऊन युवक चांगली कामगिरी निश्‍चित करू शकतात. असे जास्तीत जास्त आदर्शवत उदाहरणे आजच्या युवा पिढीसामोर ठेवण्याची आवश्‍यकता आहे. ग्रामीण भागातही खूप वाव आहे.. तिथल्या तिथे कौशल्याधिष्ठीत शिक्षणक्रम उपलब्ध होणे महत्वाचे ठरेल.. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतांना परीस्थितीकडे डोळसपणे  पहावे.. परीवर्तनाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी "सकाळ'ने हाती घेतलेला उपक्रम नक्‍कीच उपयुक्‍त ठरेल. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा उपक्रमात सहभाग राहील. 

-नीलिमाताई पवार, 
सरचिटणीस, मविप्र. 

Web Title: marathi news sakal for Maharashtra nilimatai pawer

टॅग्स