esakal | साक्रीत अब्‍दुल सत्‍तारांची गाडी अडविण्याचा प्रयत्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

विविध योजनांचा व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार आज येथील तहसील कार्यालयात आले होते. या बैठकीला मंत्री सत्तार येत असतानाच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

साक्रीत अब्‍दुल सत्‍तारांची गाडी अडविण्याचा प्रयत्‍न

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : नुकसानीचा आढावा घेण्यास दिरंगाई केली, केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकास राज्यात अंमलबजावणीस सरकारचा असलेला विरोध, मराठा, धनगर आरक्षणाकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष आदी मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडविण्याचा प्रयत्‍न केला. तसेच त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.

विविध योजनांचा व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार आज येथील तहसील कार्यालयात आले होते. या बैठकीला मंत्री सत्तार येत असतानाच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यात प्रामुख्याने तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेण्यास पालकमंत्र्यानी उशीर केला असून, शेतकऱ्यांचे पिक काढणीवर आल्यानंतर आढावा घेतला जात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांना राज्य सरकार केवळ राजकीय दृष्टीकोनातून विरोध करत आहे. 

भाजपने घेतलेला निर्णय सरकारने घेतला मागे
राज्यातील मराठा व धनगर बांधवांच्या आरक्षणाकडे देखील सरकार दुर्लक्ष करत असून, या दरम्यानच पालकमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघात एका मराठा बांधवास याबाबतीत अपशब्द वापरले होते. शहरातील अतिक्रमणे नियमित करण्याचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय देखील या सरकारने रद्द केला असल्याने या सर्वांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यानी यावेळी सांगितले. या आंदोलनात भाजपा जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, सरचिटणीस प्रदीप नांद्रे, माजी पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, माजी शहराध्यक्ष महेंद्र देसले, बाबा पठाण, अड.सुरेश शेवाळे, बंटी सोनवणे, संजय पाटील आदी सहभागी झाले होते.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top