साक्री शहरातील रस्ते होणार चकाचक 

road
road

साक्री : "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर "लॉकडाउन'नंतर आज प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विविध भागातील रस्तेकामांसह अमरधाम शेड दुरुस्ती व मान्सूनपूर्व कामांना मान्यता दिली. शहरातील रस्तेकामांसाठी राज्य सरकारकडून तीन कोटींचा सहाय्य निधी मंजूर केला असून, त्यातून बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण होईल. निधी मंजुरीसाठी आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठपुरावा केला, अशी माहिती नगराध्यक्ष अरविंद भोसले, गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनी बैठकीत दिली. 

नगराध्यक्ष भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपनगराध्यक्षा स्वाती बेडसे, गटनेते नागरे, सभापती प्रेरणा वाघ, वर्षा येवले, बांधकाम सभापती सुमित नागरे, नगरसेवक ऍड. शरद भामरे, योगेश कासार, डॉ. सुनील सुर्वे, नगरसेविका सोनल नागरे, ऍड. पूनम काकुस्ते-शिंदे, रत्नाबाई भिल, मंगला सोनवणे, अपर्णा भोसले, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, कार्यालय अधीक्षक सुनील चौधरी, जुबेर शाह आदी उपस्थित होते. 

या कामांना दिली मंजुरी 
बैठकीत प्रभाग एकमधील सखारामनगर व सावरकरनगर येथील रस्ते दुरुस्ती, प्रभाग दोनमधील स्वामी सोसायटी व नयना सोसायटीअंतर्गत रस्ता डांबरीकरण, प्रभाग पाचमधील विद्यानगर व समतानगर, अरिहंतनगरअंतर्गत रस्ता डांबरीकरण, प्रभाग दोनमधील रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग चारमधील रस्ता डांबरीकरण, प्रभाग तीनमधील छोरिया टाऊनशिप व शिक्षक कॉलनीअंतर्गत रस्ता डांबरीकरण आदी कामांना मंजुरी देण्यात आली. यासह प्रभाग सोळामधील चांदतारा मोहल्ला ते तळफरशीपर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणा कामासही मंजुरी दिली तर पिंपळनेर रस्त्यालगतच्या नवीन अमरधाम सुधारणा व एक शेड विस्तारीकरणाच्या कामासही मंजुरी दिली. यावेळी मान्सूनपूर्व नालेसफाई व अन्य कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

गर्दी नियंत्रणासाठी विविध सूचना 
दरम्यान, यावेळी आजच्या "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या "साक्रीकरांना कोरोनाची भय ना चिंता' या वृत्ताची दखल घेत शहरातील वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्याबाबत नगराध्यक्ष भोसले व गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. यात भाजीपाला व फळविक्रेत्यांना निश्‍चित जागा देणे तसेच हातगाडी विक्रेत्यांनाही अन्यत्र एक निश्‍चित जागा देऊन शहरातील मुख्य मार्ग मोकळे करण्याबाबत सूचना दिल्या. "कोरोना'बाबतचे नियम न पाळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com