esakal | काँग्रेस महानगराध्यक्षपदी ‘आयारामांना’ संधी!
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

काँग्रेस महानगराध्यक्षपदी ‘आयारामांना’ संधी!

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर जिल्हाध्यक्ष बदलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हाध्यक्ष पदासोबतच जळगाव महानगराध्यक्षपद लवकरच भरले जाणार आहे. जळगाव महानगराध्यक्ष पदासाठी दुसऱ्या पक्षांतील ‘आयाराम’ नेतृत्वाचा शोध घेत असल्याची माहिती असून, त्यामुळे निष्ठावंतांमधून नाराजी व्यक्त होतेय.

(jalgaon district national congress city president post opportunity for outsiders)

हेही वाचा: हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस;धरणाचे दहा दरवाजे उघडले


राज्यात काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षांनी गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात येऊन स्वबळाचा नारा लावला. राज्यातही त्यांनी तीच री ओढली. जिल्ह्यात मात्र जिल्हाध्यक्ष बदलावा, अशा मागण्या श्री. पटोलेंकडे अनेकांनी केल्याने त्यांनी जिल्ह्यातील इच्छुकांना कामाचा अहवाल देण्याचे सांगितले होते. अनेकांनी कामाचा अहवाल, सामाजिक कार्य, निवडणुकीत केलेल्या कामांचा अहवाल दिला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव ईश्‍वर मोरे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष उदय पाटील यांचा सामावेश आहे. श्री. मोरे हे काँग्रेसच्या सैनिक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र प्रदेशाचे माजी सचिव असून, राहुल गांधी विचार मंचाच्या माध्यमातून त्यांनी चांगला संपर्क प्रस्थापित केला आहे. जवान फाउंडेशनच्या माध्यमातून ते माजी सैनिकांशी जोडले गेले आहेत. दोन वेळा त्यांनी Pलोकसभा व नगरसेवकपदाची निवडणूक लढली आहे.

हेही वाचा: जळगावमध्ये बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण अधिक


या नावांचीही चर्चा
शहराध्यक्षपदासाठी पाठविलेल्या यादीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील, श्‍याम तायडे, शिवराम पाटील व इतर पक्षांतील दोन (आयाराम) यांचा समावेश आहे. गेल्या वेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्री. पटोले यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी नेमावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र डॉ. पाटील यांनी इतरांकडे बोट दाखविले होते.
शिवराम पाटील हे जागृत जनमंचच्या माध्यमातून कार्यरत असून, काँगेसचे कार्यकर्ते असून, महापालिकेची निवडणुकी लढविली आहे. जिल्हाध्यक्ष व महानगरपदांबाबत लवकरच काँग्रेसचे राज्य नेतृत्व निर्णय घेणार आहे.


काँग्रेसचे कधीकाळचे वैभव
एकेकाळी जळगाव जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. दोन खासदार, अकरा आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी बाजार समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. आता रावेर मतदारसंघ वगळता काँग्रेसचे अस्तित्व जिल्ह्यात नाही. त्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस नवीन शिलेदारांच्या शोधात आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;कोविड रुग्णांसाठी मोहाडी रुग्णालय सज्ज


तीन पक्ष फिरून आलेल्या उमेदवारासाठी प्रयत्न
जळगावात माजी नगरसेवक राहिलेल्या व तीन पक्ष फिरून आलेल्या उमेदवारासाठी जिल्ह्यातील आमदारांनी प्रयत्न चालविल्याचे बोलले जात आहे. हा उमेदवार मूळ काँग्रेसचा म्हणजे एनएसयूआयचा असला तरी नंतर तो शिवसेनेत गेला. नगरसेवक होऊन नंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून माजी खासदारांच्या आशीर्वादाने विधानसभाही लढवली. सेना आणि राष्ट्रवादीला त्याचा जराही उपयोग झाला नाही, असे असताना त्याच्या हाती जळगाव शहराची धुरा सोपविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. मात्र, त्याचा विरोधक गटही सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे.

loading image