esakal | यवतमाळच्या त्या क्वारंटईन महिलेली प्रसुती; कन्यारत्न सुखरूप 
sakal

बोलून बातमी शोधा

baby girl

बारा जणांच्या या कुटूंबाला क्‍वारंटाईन करण्यात आले होते. यात गर्भवती असलेल्या महिलेची आज प्रसुती झाली असून त्या महिलेने कन्येला जन्म दिला असून दोन्हीजण सुखरूप आहेत. 

यवतमाळच्या त्या क्वारंटईन महिलेली प्रसुती; कन्यारत्न सुखरूप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (ता. साक्री) सुरतला कामानिमित्ताने स्थायीक असणारे कुटूंब लॉकडाउनच्या काळात घरी म्हणजे यवतमाळला मार्गस्थ झाले होते. पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथून जात असताना बारा जणांच्या या कुटूंबाला क्‍वारंटाईन करण्यात आले होते. यात गर्भवती असलेल्या महिलेची आज प्रसुती झाली असून त्या महिलेने कन्येला जन्म दिला असून दोन्हीजण सुखरूप आहेत. 

ट्रकमधून सुरू होता प्रवास 

"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात 'लॉकडाउन' जाहीर केले आहे. मात्र 30 मार्चरोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेलबारी पॉइंटमार्गे सटाणा ते पिंपळनेर रस्त्याने ट्रकद्वारे हैदराबादहून राजस्थानकडे जाणाऱ्या 44 तसेच सुरतहून यवतमाळकडे जाणाऱ्या दोन बालके, चार महिला व इतर पुरुषांसह दहा जण असे एकूण 55 परप्रांतीय नागरिकांनी ताब्यात घेतले. यात गर्भवती महिलेचाही समावेश होता. 

मंगल कार्यालयात होते क्‍वारंटाईन 
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान 30 मार्चला सुरत येथून पुसद (यवतमाळ) येथे जाण्यासाठी 12 लोकांचे कुटुंब पिंपळनेर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटईन करण्यात आले होते. यात एक गर्भवती महिलेचा समावेश होता. क्वारंटाईनमध्ये परिवाराला सदर महिलेची चिंता होती. तहसीलदार विनायक थविल यांनी सदर महिलेला हिंमत देत कुठल्याही प्रकारे घाबरू नकोस तुझी सर्व काळजी प्रशासन घेईल. महिलेची तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राकेश मोहने करीत होते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्‍यातील मोहाई हे कुटुंब असून त्यांची राहण्याची व्यवस्था येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. 

पहाटेच प्रसुती 
महिलेला आज पहाटे त्रास होऊ लागल्याने त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर महिलेने पहाटे 5 वाजून 45 मिटांनी नॉर्मल प्रसुती होवून एका कन्येला जन्म दिला. त्यामुळे सोबत असलेले कुटूंबातील सदस्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विश्व रुहानी मानव केंद्र यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या माध्यमातून महिलेला पोषण आहार दिला जात आहे, मातेने कन्येला जन्म दिल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून सदर महिलेला गोडशिरा दिला गेला. तहसीलदार विनायक थविल यांनी माता व मुलीची रुग्णालयात जाऊन भेट घेत चौकशी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश मोहने यांनी सांगीतले की महिलेची नॉर्मल प्रसुती करण्यात आली. बाळ निरोगी असुन वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश भामरे, डॉ. विवेक नुक्ते व त्यांच्या सहकार्यानी ही प्रसुती केली. 
 

loading image