संभाजी भिडे यांना 31 ऑगस्टला हजर रहा, जिल्हा न्यायालय बजावणार नोटीस 

नरेश हळणोर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नाशिक : गेल्या जूनमध्ये नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी नाशिकच्या जिल्हा न्यायालयामार्फत हजर होण्याचे आदेश बजावले जाणार आहेत. नाशिक महापालिकेने याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात भिडे गुरुजी यांच्याविरोधात खटला दाखल केला असून त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालय त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावणार आहे. 
... 

संभाजी भिडे यांच्याविरोधात महापालिकेने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला असून त्यासंदर्भात गेल्या मंगळवारी (ता.7) जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी महापालिकेतर्फे युक्तिवाद करण्यात आला. त्यावर आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ऍड. सुवर्णा शेफाल यांनी युक्तिवाद केला असता, तो ऐकून घेतल्यानंतर न्या.जयदीप पांडे यांनी संभाजी भिडे यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, न्यायालयामार्फत त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या चौकशी समितीसमोर उपस्थित न राहणारे संभाजी भिडे न्यायालयात उपस्थित राहणार का? याकडे आता लक्ष लागून आहे. 

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची नाशिकमध्ये गेल्या 10 जून रोजी सभा झाली होती. त्या सभेमध्ये भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी "लेक लाकडी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास सदरील वक्तव्याची खातरजमा करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश

अतिरिक्त संचालकांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले. परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने यासंदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. 
 
Web Title: marathi news sambaji bahide