स्वप्न शिक्षकाचे मात्र, वर्दी फौजदाराची 

residentional photo
residentional photo

नाशिक-"मानाची तलवार' पटकावण्याची प्रत्येक प्रशिक्षणार्थीची इच्छा असते. 117 व्या बॅचच्या संतोष कामटे याची ती इच्छा पूर्ण झाली. कुगाव (जि. सोलापूर) या छोट्याशा गावातील शेतकऱ्याचा एकुलता मुलगा संतोष. कला शाखेची पदवी घेतानाच त्याने डी.एड.ही पूर्ण केले. शिक्षक होऊन समाजाला ज्ञानार्जन करण्याचे त्याचे स्वप्न. त्यासाठी तो टीईटीच्या परीक्षेचा अभ्यासही करीत होता.

   2017 मध्ये त्याने परीक्षाही दिली. याचदरम्यान त्याने महाराष्ट्र राज्यसेवेचीही परीक्षा दिली. पहिल्यांदाच दिलेल्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ अशी कोणतीही अपेक्षा त्याला नव्हती, पण टीईटीची परीक्षा उत्तीर्ण होऊ, असा आत्मविश्‍वास होता. नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य असावं. टीईटीच्या निकालाचा घोळ सुटेना आणि उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल लागला. संतोष उत्तीर्ण झाला.

आणि चांगले प्रोत्साहन मिळाले

   शेतकरी आई-बापाला आकाश ठेंगणं झालं. दोघा बहिणींनाही आपला भाऊ पोलिस झाल्याचा अत्यानंद झाला. संतोषने प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रवेश केला आणि काही दिवसांनीच टीईटीचा निकाल लागला. त्यातही तो उत्तीर्ण झाला. त्यामुळे द्विधा मन:स्थितीत संतोष सापडला. त्याचे शिक्षकाचे स्वप्न होते; परंतु पोलिसाच्या भूमिकेतूनही आपण समाजाला न्याय देऊ शकतो, असेच काहीसे त्याच्या मनात आले.

अपार मेहनतीचे फळ

 शिक्षकाचे स्वप्न बाजूला सारून पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी जिद्दीने अभ्यास, मेहनत घेतली. त्याचेच फळ म्हणजे "मानाच्या तलवारी'चा तो मानकरी ठरला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या शेतकरी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. संतोषला येथेच थांबायचे नाही. पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायची असून, उपअधीक्षक पदाचे स्वप्न तो पाहत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com