esakal | श्रीलंकेच्या माजी मंत्र्याची पत्नी महानुभव पंथाच्या प्रेमात, ​करतात ऑनलाइन प्रचार, प्रसार !
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीलंकेच्या माजी मंत्र्याची पत्नी महानुभव पंथाच्या प्रेमात, ​करतात ऑनलाइन प्रचार, प्रसार !

श्रीलंकेत आजही रामायण काळातील अनेक संदर्भ स्थाने आहेत. तेथे सीता मातेचे मंदिर देखील आहे. शाळा-महाविद्यालयात महात्मा गांधींची जयंती-पुण्यतिथी साजरी होते.

श्रीलंकेच्या माजी मंत्र्याची पत्नी महानुभव पंथाच्या प्रेमात, ​करतात ऑनलाइन प्रचार, प्रसार !

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा  : चक्रधर स्वामींनी माणसाला माणसासारखे वागण्याची शिकवण दिली. त्यांनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून ही शिकवण जनमानसात रुजवली. त्या शिकवणीच्या प्रेमात श्रीलंकेचे माजी आरोग्यमंत्री लक्ष्मण एबे गुणरत्ने यांच्या पत्नी निलाती गुणरत्ने पडल्या त्यांनी केवळ आपले प्रेम वैयक्तिक पातळीवर न ठेवता त्याचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच ऑनलाइनच्या माध्यमातून त्या श्रद्धा विकसित करीत आहेत. श्रीमती गुणरत्ने उद्या (ता.३०) रविवारी होणाऱ्या गोविंद प्रभूंची जयंती साजरा करणेसाठी श्रीलंकेत जय्यत तयारी करीत आहेत. 

तसेच त्यांनी गेल्या वर्षी भारतातील महानुभाव पंथाच्या श्रद्धा स्थानाला भेट दिली होती. त्यांनी डिजीटल तंत्राद्वारे प्रबोधन श्रीलंकेत राहून महानुपंथाच्या सण, उत्सव साजरा करीत आहेत. श्रीलंकेत आजही रामायण काळातील अनेक संदर्भ स्थाने आहेत. तेथे सीता मातेचे मंदिर देखील आहे. शाळा-महाविद्यालयात महात्मा गांधींची जयंती-पुण्यतिथी साजरी होते. भारतीय परंपरेचे अनेक संदर्भ आढळतात तरी तेथील संस्कृती काहीशी वेगळी आहे. याच देशातील माजी आरोग्यमंत्री लक्ष्मण यांच्या पत्नी निलाती यांनी दोन वर्षापुर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील पवन नावाच्या व्यक्तीच्या संपर्कातून अध्यात्मिक विषयावर चर्चा केली. त्यातून त्यांना महानुभव पंथाची माहिती झाली. महानुभाव पंथाचे जाधववाडी ( जि.पुणे ) येथील नरेंद्रमुनीबाबा अंकूळनेरकर महानुभाव यांची माहिती मिळाली. त्यातून त्या प्रभावित झाल्या बाबांना भेटण्यासाठी थेट भारतात आल्या. त्यावेळी बाबांचे वाकी (जि. अमरावती) येथे प्रवचन सुरू होते. तेथेच त्यांची भेट घेत श्रीमती नीलाती यांनी महानुभाव पंथात बाबांच्या शिष्यां झाल्या . बाबांनी त्यांचे सांप्रदायिक नाव कृष्णप्रिया असे ठेवले आहे.

महानुभाव पंथांचा अभ्यास करुन विविध स्थळांना भेटी

महानुभाव पंथ स्वीकारल्यानंतर कृष्णप्रिया अर्थात श्रीमती नीलाती दोन वेळा भारतात आल्या होत्या. त्यांनी महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानांना भेट देऊन सर्व माहिती मिळवली. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे विचार जाणून घेत त्यांनी रिध्दपूर, माहूर, समशेरपूर तसेच सारंगखेडा येथील दत्त मंदिरांना भेट दिली होती.

डिजीटल तंत्राद्वारे प्रबोधन, उत्सव साजरा

चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त चक्रधरस्वामींचे कार्य, महानुभाव पंथांची ओळख त्यांनी जगाला दिलेला संदेश यावर प्रकाश टाकण्यासाठी वर्षभर विविध प्रबोधने, महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानी कडून सोशल मिडीयावर डिजीटल तंत्राद्वारे दाखविण्यात येत आहे. श्रीमती कृष्णाप्रिया श्रीलंकेत प्रबोधन काम पाहतात. तसेच चक्रधर स्वामी जयंती, नारळी पौर्णिमा उत्सव, उद्या (ता. 30) गोविंद प्रभु जयंती ही साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करीत आहेत. भारतीय सण, उत्सव साजरा करुन त्या सोशल मिडियांवर शेअर करतात.


विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत. त्यास अनेकजण अध्यात्मिक जोडही देत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या आरोग्य मंत्र्यांच्या पत्नी श्रीमती निलावांती तथा कृष्णप्रिया महानुभाव पंथाच्या माध्यमातून आपले विचार आचार शुद्ध ठेवत आरोग्य जपत आहेत. त्यांना महानुभाव पंथाचा लळा लागला आहे.सारंगखेडा येथे महानुभाव पंथाचे विशेष प्राबल्य आहे येथे एकमुखी दत्त मंदिर आहे त्यांना ही कृष्णप्रिया यांनी भेट दिली होती. संप्रदायाचा प्रसार करत असल्याचा विशेष आनंद वाटतो. त्यांनी भारतात होणाऱ्या महानुभाव पंथाचे उत्सव श्रीलंकेत ही देवघरांची सजावट, गुढी उभारून देवाचे नामस्मरण करतात. ते सर्व सोशल मिडियांचा माध्यमातुन दिसते.
- दिवाकरमुनी महानुभाव , सारंगखेडा.

संपादन- भूषण श्रीखंडे