अवलिया शिक्षक फिरतोय दारोदार; काय आहे कारण वाचा

teacher
teacher

सारंगखेडा : ॲण्ड्रॉईड मोबाईल, नेटवर्क प्रॉब्लेम, ऑनलाईन कनेक्टींव्हीटी अशा विविध कारणांनी बहुसंख्य ग्रामीण विद्यार्थ्यांना आॕनलाईनच्या शिक्षणांपासून वंचित रहावे लागत आहे. मात्र सातुर्के (ता. नंदूरबार) येथील एका अवलिया प्राथमिक शिक्षकाने दारोदारी फळा घेऊन शालेय अभ्यासक्रमाचे धडे देतांना दिसत आहे. विद्यार्थीही मोठ्या कुतूहलातून अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. शासनाने ऑनलाईन शाळा भरवायला सांगितले आहे. श्रमिक वस्त्यांमधील हजारो विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. शाळेतील शिक्षकांनाही ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवतांना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी मोबाईल रेंज नसल्याने स्मार्ट फोन असतांनाही ऑनलाईन शिक्षणांपासून वंचित आहेत. या अडचणींवर मात करीत सातुर्के (ता. नंदूरबार) येथील शिक्षक संदिप साठे यांनी शाळेचा फळा सोबत घेत गावातील विद्यार्थ्यांच्या दारोदारी जाऊन शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. या अभिनव उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असून शिक्षणच दारापर्यंत आल्याने अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा मार्ग सूकर झाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसतोय. विशेष म्हणजे विद्यार्थी मोठ्या कुतूहलातून अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे पालकही समाधानी आहे.

अन्‌ मोबाईलचा खर्च वाचला
सातुर्के गावाची लोकसंख्या बाराशे असून गावातील बहुतांश लोक मोलमजूरीवर अवलंबून आहेत. श्रमिक वस्ती असल्याने मुलांसाठी वेगळा ॲण्ड्रॉईड मोबाईल घेणे शक्य नसल्याने गावातील प्राथमिक शिक्षक श्री. साठे यांनी विद्यार्थ्यांच्या या अडचणी जाणून घेत त्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे ठरविले. त्यामुळे पालकांचा मोबाईल डाटाचा खर्च वाचला आहे.

येथील विद्यार्थी गरीब आहेत. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ते अभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत; म्हणून विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत फळा असा उपक्रम राबवून दैनंदिन शिक्षण दिले जात आहे, विद्यार्थीही मोठ्या कुतूहलातून अभ्यास करतात.

- संदिप साठे, शिक्षक 


संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com