बागलाण तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य

रोशन खैरनार
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सटाणा : शहरात सध्या स्वच्छता अभियान सुरु असताना येथील बागलाण तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करणारे प्रशासनच स्वच्छतेबाबत किती उदासीन आहेत याचे जिवंत उदाहरण तहसील आवारात बघावयास मिळत आहे.

बागलाण तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पोलीस विभागाने अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या व चोरीच्या शेकडो दुचाकी भिंतीलगत उभ्या केलेल्या आहेत. तपास पूर्ण न झाल्याने अथवा अन्य कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या दुचाकींवर मोठ्या प्रमाणात घाण व धूळ पसरली आहे. 

पावसाळ्यात या वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने डास मच्छरांचे साम्राज्यही पसरते. तहसील कचेरी व आवारातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मंदिराजवळही अस्वच्छता असून इतस्तत: दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने ओंगळवाणे प्रदर्शन होत असते. कचेरीच्या आवारात महसूल खात्यातर्फे नेहमीच जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर तर आजूबाजूला खाजगी व पोलीस खात्याच्या दुचाकी अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जातात. हा सर्व परिसर वाहनांनी व्यापल्याने या परिसरात तालुक्यातून शासकीय कामास येणाऱ्या नागरिकांना उभे राहण्यास सुद्धा जागा मिळत नाही. याबाबत एका महसूल कर्मचाऱ्याला विचारले असता आम्ही काहीच करू शकत नाहीत, तुमची तक्रार तहसीलदार साहेबांकडे करा, असे उत्तर मिळते. 

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी पर्यायी जागाच उपलब्ध नसल्याने पोलीस कोठडीच्या बाजूच्या खोल्यांमध्ये हा मुद्देमाल खच्चून भरून ठेवण्यात आला आहे. तहसील व पोलीस प्रशासनातर्फे आवारात स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच नसल्याने याठिकाणी नेहमीच अस्वच्छता पसरलेली असते. या प्रकारामुळे नागरिकांची कुचंबना होत असून पोलीस व महसूल विभागाने मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. नागरिकांमध्ये तर या प्रकारावरून तीव्र नाराजी पसरली आहे. 
तहसील कचेरीचे आवार मोठे असताना त्या ठिकाणी जप्त केलेली वाहने व इतर वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते. मात्र यासंदर्भात महसूल विभाग व पोलीस खाते कोणतीही भूमिका घेताना दिसत नसल्याचे दिसते. उद्या देशाचा 69वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असून कार्यक्रमास शहरातील शाळा महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांसह नागरिक उपस्थित राहणार आहेत. मात्र महसूल विभाग व पोलीस ठाण्याच्या उदासीनतेमुळे ऐन प्रजासत्ताक दिनीच आवारातील या अस्वच्छतेचे दर्शन नागरिकांना होणार आहे. तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारीच स्वच्छता ठेवण्याबाबत उदासीन असतील तर नागरिक हे अभियान कसे राबवतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Web Title: Marathi news satana news dirty offices