स्टेट बॅंकेच्या ग्राहक मेळाव्यात तक्रारींचा पाढा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

नाशिक- स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ग्राहकांना नेहमी ताटकळत थांबावे लागते, बसण्यासाठी पुरेशी जागा नसते, एटीएम असुरक्षित असतात... अशा एक नव्हे अनेक तक्रारींचा पाढा काल ग्राहकांनी ग्राहक मेळाव्यात वाचला. दरम्यान, 42 कोटी ग्राहकसंख्या असलेल्या या सर्वांत मोठ्या बॅंकेचे ग्राहकच आमचे सर्वेसर्वा असून, त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता पडू नये, हाच आमचा प्रयत्न असल्याचे आश्‍वासन बॅंकेचे मुख्य महाप्रबंधक जी. रवींद्रनाथ यांनी दिले. 

स्टेट बॅंकेतर्फे कुसुमाग्रज स्मारकात ग्राहक मेळावा घेण्यात आला. त्यात ग्राहकांनी बॅंकेचे कौटुंबिक सदस्य या नात्याने आपल्या सूचना करण्याचे आवाहन बॅंकेने केले होते. त्या वेळी उपस्थित ग्राहकांनी कर्मचारी वर्गाच्या सौहार्दपूर्ण सेवेचे कौतुक करतानाच अजूनही ग्राहक सेवेत सुधारणा करण्यास बराच वाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. बॅंकेचे मुख्य महाप्रबंधक जी. रवींद्रनाथ, महाप्रबंधक संजीवकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळवा झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sbi meet