#डीएडनकोरेबाबा नोकरीचा मार्ग अवघड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिकः इतर सर्वच क्षेत्रात झटपट पद,प्रतिष्ठा आणि बक्कळ पगार देणारी नोकरी उपलब्ध होते, त्यामुळेच डीएडकडे वळण्याचा मुलांचा कल कमी झाला आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी करूनही पुढे काहीच होत नाही, असा नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

सर्व प्रकारच्या पात्रता मिळवूनही शिक्षक भरती होत नसल्याने माझ्यासारखे अनेक युवक संधीच्या प्रतिक्षेत आहेत. पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स नोंदवूनही प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने युवक हतबल झालेले आहेत. नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने, यामुळे डी.एड. सारख्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचेही विद्यार्थी आता टाळू लागले आहेत. 
-ईश्‍वर फणसे, उमेदवार. 

अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरही परीणाम झाल्याचे दिसते. बी.एड. अभ्यासक्रमाला मात्र यंदा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांकरीता अर्ज करणाऱ्यांची संख्या चांगली आहे. 
-प्राचार्य डॉ.चंद्रकांत बोरसे, 
ऍड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news service problem