esakal | पाचशेची नोटेचा दोन ठिकाणी डाव हुकला, अखेर चोरांनी सारंगखेडाला डाव साधला !
sakal

बोलून बातमी शोधा

पाचशेची नोटेचा दोन ठिकाणी डाव हुकला, अखेर चोरांनी सारंगखेडाला डाव साधला !

मी पी.डब्ल्यु.डी. विभागात नोकरीला आहे, चाळीस हजार पगार आहे. आजीची तब्येत बरी व्हावी म्हणून मंदिरात पैसे दान करण्यासाठी आलो आहे.

पाचशेची नोटेचा दोन ठिकाणी डाव हुकला, अखेर चोरांनी सारंगखेडाला डाव साधला !

sakal_logo
By
दिनानाथ पाटील

शहादा: आजीची तब्येत बरी व्हावी म्हणून मंदिरात दान करावयाचे आहे असे सांगत मंदिराजवळच्या घरातील महिलेला न्यायचे, तेथे पाचशेच्या नोटांसोबत सोने ठेऊन पुजा केली तर दान लागू होते. तुमच्या अंगावरील दागिने तात्पुरते ठेवा, पुजा झाली की परत घ्या असे सांगून सोने लंपास करणाऱ्या दोघांचा प्रयत्न म्हसावद व लोणखेडा येथे फसला. मात्र शेवटी पाचशेच्या त्या नोटांच्या मदतीने त्यांनी सारंगखेडा येथे आपला डाव साधत अडिच लाखावर डल्ला मारला.

नक्की वाचा ः  कृषी विभागाचे आदेश;  शेतकरी अपघात विम्याचा आता दोघांना लाभ
 

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास म्हसावद येथील एका मंदिरात दोन तरूण दुचाकीने आलेत. आजीची तब्येत बरी व्हावी म्हणून मला पैसे दान करावयाचे आहे असे सांगत मदिरा जवळ असलेल्या वृद्धाला मंदिर उघडायला सांगितले. पुजेसाठी त्याच घरातील आजीला बोलाविले. दरम्यान आजोबांना पुजेचे तांदूळ आणावयाला पाठवित आजीला पैश्यांसोबत सोन्याची पुजा केली तर दान लागू होईल असे सांगत दागिने पुजा थाळीत पाचशेच्या नोटांच्या खाली रूमालावर ठेवले. मात्र आजोबा वेळेत आले व बाहेर तरूणांचा घोळका असल्याने दान न करता पैसे घेऊन ते तरूण परत गेलेत. मात्र, या चोरट्यांचे व गाडीचे फोटो गल्लीतील सी.सी. कॕमेरामध्ये क्लिक झालेत. गाडीच्या नंबर प्लेटला गारा लावत नंबर लपविण्यात आला होता.

दुपारी बाराच्या सुमारास लोणखेडा गावात शिवमंदिरा समोर ओट्यावर बसलेल्या आजी जवळ जात तेथेही तीच कॕसेट वापरीत आजीला मंदिरात नेले. आजीलाही पुजा करण्यासाठी सोन्याचे दागिने काढण्यास सांगितले. दरम्यान त्या आजीची सून आजीला शोधत मंदिरात आली. त्यांनाही पैसे दान करायचे असल्याचे सांगितले. त्यावर गावात महिला मंडळातर्फे भागवत कथा कार्यक्रम आहे तेथे दान म्हणून जमा करते असे सांगितले. मात्र, त्या तरूणांनी तेथून पळ काढला. 

वाचा ः धुळे जिल्ह्यातील 13 पैकी 11 प्रकल्प फुल्ल !
 

दोन्ही घटना एकाच दिवसाच्या व सारख्याच, सुदैवाने चोरटे अयशस्वी ठरल्याने सोने वाचले.,मात्र याच पाचशेच्या नोटांचा आधार घेत चोरट्यांनी सारंगखेडाला आपला डाव साधला.

तालूक्यात विना नंबर प्लेट व अस्पष्ट नंबर असलेल्या अनेक दुचाकी मोटरसायकली सुसाट वेगाने जाताना दिसतात. अश्या गाड्यांची कागदपत्रे तपासणी सुरू केल्यास चोरीला गेलेल्या गाड्यांचा सुगावा लागू शकतो. पोलिसांनी अश्या गाडी मालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

चोरट्याचे बोल
मी पी.डब्ल्यु.डी. विभागात नोकरीला आहे, चाळीस हजार पगार आहे. आजीची तब्येत बरी व्हावी म्हणून मंदिरात पैसे दान करण्यासाठी आलो आहे, असे सांगत पाचशे रूपयांच्या नोटा दाखवतो.

चोरट्यांचे वर्णन
मोटार सायकल चालविणारा अपटु डेट, स्मार्ट, अंगावर लेनिनचा शर्ट. घारे डोळे तर एका कानात काळा दोरा तर दुसऱ्या कानात काळी रिंग. दुसरा अत्यंत गावंढळ होता.  


संपादन- भूषण श्रीखंडे

loading image