उत्कृष्ट आरोग्य केंद्र म्हणून शहादाचे आरोग्य केंद्र राज्यात दुसरे !

कमलेश पटेल
Monday, 14 December 2020

पथक, आरोग्य केंद्राबरोबरच उत्कृष्ट नागरी भागातील वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. योगेश पाटील यांनाही ही पुरस्कार मिळणार आहे.

 

शहादा : येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यात आयुष्यमान भारत कार्यक्रमातून व राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उत्कृष्ट आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून राज्यात दुसरा व नागरी भागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्कार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकताच जाहीर केला.लवकरच पुरस्काराचे ऑनलाइन वितरण होणार आहे .या पुरस्कारामुळे अतिदुर्गम नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाची मान उंचावली जाणार आहे.

 

आवश्य वाचा- ..अन् बाराशे रुपयांत ‘आयजी’ 

आयुष्यमान भारत व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तथा आरोग्य वर्धिनी केंद्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मधुकर पाटील, डॉ. के. जी. पाटील, अब्दुल कुरेशी, योगिता वळवी ,जया सोळंकी, कमलेश्‍वरी चव्हाण, गोरख कामदे,दीपमाला मोरे, नेहा मराठे, अनिता पावरा यांच्या पथकाने आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पथक, आरोग्य केंद्राबरोबरच उत्कृष्ट नागरी भागातील वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. योगेश पाटील यांनाही ही पुरस्कार मिळणार आहे. या आठवड्यात केंद्रीय मंत्रालयाकडून ऑनलाइन पुरस्काराचे वितरण होणार आहे.

वाचा- शहादा तालुक्‍यात २२ ग्रामपंचायतींचे आरक्षण सर्वसाधारण 

" शहादा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्रीय मंत्रालयाकडून उत्कृष्ट आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून गौरव झाल्याने निश्चितच आरोग्य विभागासाठी अभिनंदनीय बाब आहे. आरोग्याच्या अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न आहे."--डॉ. नितीन बोडके ( जिल्हा आरोग्य अधिकारी)

" वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्न अविरत सुरू राहील पुरस्कार मिळाल्याने काम करण्याची उर्मी मिळाली".--(डॉ. योगेश मधुकर पाटील, वैद्यकीय अधिकारी)

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada best health center the stat shahada health center