शार्पशूटर ते आमदार! 

Rajesh Padvi
Rajesh Padvi

शहादा ः शहादा- तळोदा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाडवी यांची पोलिस दलातील कामगिरी अतिशय अभिमानस्पद आहे. मुंबईत पोलिस निरीक्षक असलेले राजेश पाडवी हे कडक शिस्तीचे व गुन्हेगारांवर वचक ठेवणारे शार्पशूटर होते. कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली त्यांची समाजसेवा त्यांना आमदारकीपर्यंत घेऊन गेली. 

शहादा- तळोदा मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. यासाठी पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभाही झाल्या. तालुक्यातील ज्येष्ठ नेते गट-तट विसरून एकत्र आले. सगळ्यांनीच उमेदवार नवखा असल्याने प्रचारासाठी कंबर कसली; परंतु श्री. पाडवी यांनीही मुंबईत असताना आई (कै.) कलावती पाडवी यांच्या नावाने फाउंडेशन स्थापन करून समाजसेवेचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले होते. 

उपनिरीक्षक ते निरीक्षक 
श्री. पाडवी यांचे शिक्षण मुंबई येथील प्रभादेवी भागातील कीर्ती महाविद्यालयात झाले. स्पर्धा परीक्षा देऊन १५ सप्टेंबर १९९३ ला पोलिस उपनिरीक्षकपदावर ते रुजू झाले. त्यांनी नोकरीतही प्रामाणिकपणा कायम ठेवत वेगळा ठसा उमटविला. त्यांना पत्नी व मुलगी असा परिवार आहे. नोकरीत बढती मिळून पोलिस निरीक्षक झाले. मात्र, समाजसेवेमुळे त्यांना मनात नसताना राजकारणाची आवड निर्माण झाली आणि तीन ऑक्टोबर २०१९ ला पोलिस दलात २७ वर्षे सेवा करून अंधेरी पोलिस ठाण्यातून निरीक्षकपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली व राजकारणाचा ‘श्रीगणेशा’ केला. 

तालुक्यात ‘दादा’ म्हणून ओळख 
श्री. पाडवी यांनी आईच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या कलावती फाउंडेशनमार्फत समाजोपयोगी कामांवर भर दिला. अडीअडचणीवेळी लोकांना मदत करणे, आरोग्यसेवा पुरविणे यांसह सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न ते तडीस नेत होते. त्यामुळे विशेषतः तळोदा तालुक्यात ‘दादा’ या नावाने सर्वसामान्य लोक त्यांना ओळखतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com