esakal | Photo :शहादा तालुक्यात अतिवृष्टी..सर्वत्र जलमय परिस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Photo :शहादा तालुक्यात अतिवृष्टी..सर्वत्र जलमय परिस्थिती

Photo :शहादा तालुक्यात अतिवृष्टी..सर्वत्र जलमय परिस्थिती

sakal_logo
By
धनराज माळी

शहादा : शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र जलमय परिस्थिती झाली. नदी-नाले तुडुंब भरून वाहिले. शहरातील नवीन वसाहती तसेच इतर काही भागात पाणी भरल्याने जलमय परिस्थिती झाली होती. भेंडवा नाल्याला पूर आल्यामुळे काही काळ शहराबाहेरून जाणारा अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

शहादा शहरासह तालुक्यात मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली मध्यरात्री नंतर पावसाने मोठ्याप्रमाणावर जोर पकडल्याने अतिवृष्टी झाली. त्यामुळे साऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.

हेही वाचा: धुळे महापालिकेचे कारभारी सपशेल ‘फेल'

शहरालगत असलेल्या नवीन वसाहती जुना मोहिदा रस्त्यावरील मानस विहार, शिक्षक कॉलनी, अक्षरधाम सोसायटी, गोकुळधाम सोसायटी, शहादा पोलीस ठाणे,आवार, उपवनसंरक्षक कार्यालय व निवासस्थान परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य तसेच वाहनांचेही नुकसान झाल्याचे समजते.

दरम्यान शहरालगत वाहणाऱ्या बॅंडवाला नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शहादा बायपास रस्त्यावरील खेतिया - दोंडाईचा बायपास मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

शेती पिकांचे नुकसान..

दरम्यान पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामीण भागात ही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तोंडनीला आलेले मुग काढनीला आलेला कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे .तसेच ऊस ही आडवा झाल्याचे समजते.

loading image
go to top