esakal | शेकडो किलोमीटरची पायपीट करून परप्रांतीय मजूर गावागावांत परतू लागले

बोलून बातमी शोधा

worker bak to hoom
शेकडो किलोमीटरची पायपीट करून परप्रांतीय मजूर गावागावांत परतू लागले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहादा : परप्रांतात विशेषता गुजरात राज्यात हजारोंच्या संख्येने राज्यातील स्थलांतरित झालेल्या आदिवासी मजुरांना आपापल्या गावी परतण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, तर काही मजूर शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून तालुक्यात परतले आहेत. पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यापासून मजूर परत यायला सुरुवात करतात. गुजरात राज्यात कडक निर्बंध लावल्याने शेकडो मजूर अडकले आहेत. मजल दर मजल करत गाव गाठत आहेत.

हेही वाचा: संचारबंदीतही..चोरीछुपे व्यवसाय सुरू !

दरवर्षी शहादा तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव ऊस तोडसाठी गुजरात राज्यात जातात साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून ट्रकच्या ट्रक भरून मजुरांचे स्थलांतर सुरू होत असते. ठेकेदारामार्फत त्यांना ॲडव्हान्स मध्ये धान्य व पैसा दिला जातो. वाहनांनी त्यांना घेऊन जातात व परत देखील आणतात पण गुजरात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्बंध लावलेले आहेत. कोरोना चाचणी केल्याशिवाय दुसऱ्या राज्यात जाऊ दिले जात नाही म्हणून मजूर अडकले आहेत. वाहनांची व्यवस्था झालेली नसल्याने वेगवेगळ्या रस्त्याने पायी मजूर राज्याकडे निघाले आहेत. सर्वाधिक मजूर गुजरात राज्यातील सोनगड, बारडोली, चलथान, कर्जन, सुरत, बलसाड या भागात आहेत. ऊस तोडणीचे काम करत असतात पावसाळ्यापूर्वी ते परत आपापल्या गावी दाखल होतात व आपले घर दुरुस्त करत असतात पण लॉकडाउन मुळे ते अडचणीत आले आहेत.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

गुजरात सरकारने दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र शासनाने अर्थात जिल्हा प्रशासनाने कमीतकमी राज्याच्या सीमेवरून वाहनांची व्यवस्था करून मजुरांना आणण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात किती मजूर आले, कोणकोणत्या गावात आले याची माहिती करून त्यांची तपासणी करून औषध उपचार करावेत. स्वस्त धान्य त्यांना पुरविण्यात यावे, अशी मागणी शेतमजूर युनियन लाल बावटाचे कार्यकर्ते कॉम्रेड सुनील गायकवाड यांनी केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे