अजब फंडा : घरपोच दारूसाठी व्हॉटस्‌ऍपवर बुकिंग... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

मद्याची विक्री बंद असल्याने व्यसनाधिनांची मानसिकता लक्षात घेऊन दारूची होम डिलेव्हरीच्या नावाने फेसबुक व हॉटसअपवर ऑनलाइन पैसे टाकण्याचे सांगत फसवणुकीचा हा प्रकार दुकानदारानेच उघडकीस आणला आहे. 

शहादा : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वाईन शॉप आणि बिअरबारबंद असल्याचा फायदा घेत एकाने येथील अधिकृत विक्रेते राजपाल वाईन यांच्या नावाने फेसबुक व हॉटसअपवर खाते उघडून घरपोच दारू मिळेल. त्यासाठी पेटीएमद्वारे खात्यावर पैसे जमा करा असे आवाहन केल्याने खळबळ उडाली आहे. सबंधित दुकानाचे मालक गुरूचरणसिंग जोधसिंग राजपाल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. 

क्‍लिक करा - अगोदर दिली धमकी मग रात्री संधी साधत क्‍वारंटाईन केलेल्या युवकांनी केले भलतेच 

मद्याची विक्री बंद असल्याने व्यसनाधिनांची मानसिकता लक्षात घेऊन दारूची होम डिलेव्हरीच्या नावाने फेसबुक व हॉटसअपवर ऑनलाइन पैसे टाकण्याचे सांगत फसवणुकीचा हा प्रकार दुकानदारानेच उघडकीस आणला आहे. 

येथील बसस्थानक नजीक दोंडाईचा रस्त्यावर राजपाल वाइनशॉप नावाचे देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान आहे. सध्या ते बंद आहे. त्यामुळे अनेक मद्यपींची अडचण झाली. दारूपायी अस्वस्थ होणारे ती कुठेच उपलब्ध होणार नसल्याने त्याचा फायदा घे हे कृत् करण्यात आल्याचे दिसते. 

हेपण वाचा - Video एमआयडीसी ठाण्यासाठी "टिकटॉक सिंघम'ची निवड!; निरीक्षकाच्या व्हायरल व्हीडीओची चर्चा

श्री. राजपाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दुकानाच्या नावाने फेसबुक न व्हॉटसअपवर बनावटखाते उघडून राजपाल वाईन शॉपमधून सर्व प्रकारचे बिअर व व्हिस्की होम डिलिव्हरीने उपलब्ध करून दिले जाणार आहे असे म्हटले आहे. त्याकरीता ६२६१२४५०४९ केलेल्या क्रमांकावर आॕनलाईनने पैसे टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेसेज व्हॉट्स ॲप व फेसबुकच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती फसवणूक करीत असून त्याची दखल घ्यावी. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून वाईन शॉपचे व्यवहार पूर्णतः बंद आसून फेसबुक व व्हॉट्सप वरील नंबरवर कोणीही संपर्क करू नये असे आवाहन केले आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीची दखल घेत अनोळखी, संबंधित मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada wine home dilevary create whatsaap group