एसटी स्वीकारणार एलपीजी इंधनाचा पर्याय...डिझेल दरवाढीवर उपाय ! 

st bus
st bus

शनिमांडळ : कोरोना संकटामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडाले आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसचा महागाईमुळे उत्पन्न आणि खर्चाशी ताळमेळ बसत नसल्याने भविष्यात एलपीजी इंधनाची कास धरण्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून पहिल्या टप्प्यात बाराशे बसचे इंजिन डिझेल बदलून एलएनजी इंधनात परावर्तित करण्यात येणार आहे. 


राज्‍य महामंडळामध्ये १८ हजार बस आहेत. या सर्व बस डिझेल इंधनावर धावतात. एसटीच्या एकूण महसुलाच्या ३४ टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होत आहे. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सुस्थितीत असलेल्या सर्व बस डिझेल बदलून एलपीजीमध्ये रूपांतरित करणे गरजेचे आहे. 

खाजगी बसची बांधणी 
एसटीकडे सध्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. कार्यशाळेमध्ये बसची पुनर्बांधणी करण्यात येते. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खासगी बस बांधून त्याद्वारे महसूल मिळण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली आहे. खासगी वाहनधारकांना बस बांधण्यासाठी एसटीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

टायर पुनःस्थिरीकरण प्रकल्प (रिमोल्डिंग) 
सध्या एसटी महामंडळाचे राज्यभरात नऊ टायर पुनःस्थिरीकरण प्रकल्प र्यरत आहेत. प्रकल्पांद्वारे एसटीसाठी लागणाऱ्या टायरचे पुनःस्थिरीकरण करण्यात येते. भविष्यात या प्रकल्पाची क्षमता लक्षात घेता, एसटीची गरज भागवून व्यावसायिक तत्त्वावर टायर पुनःस्थिरीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महामंडळाने भविष्यात खर्चात बचत करीत व प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच महामंडळाच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने व्यावहारिक योजना तयार करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले आहेत. भविष्यात वाहतूक व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करून फायद्याच्या मार्गावरील बसफेऱ्यांची संख्या वाढवून अनुत्पादित किलोमीटर वाहतुकीतून कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

मालवाहतुकीला प्रतिसाद 
महिन्याभरापूर्वी एसटीने सुरू केलेल्या वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, एका महिन्यात ९०७ फेऱ्यांद्वारे सुमारे ७२ लाखांचा महसूल मिळविला आहे. डिसेंबर २०२१ अखेर दोन हजार मालवाहू वाहने तयार करून त्याद्वारे सुमारे २५० कोटी रुपये महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी शासकीय मालवाहतूक तिकडे वळविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

एलपीजीच्या निर्णयाचे स्वागत आहे. प्रदूषण कमी होण्यास या निर्णयाने मदत होईल. सद्यःस्थितीत एसटीच्या कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी अजून काही निर्णय होणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांना संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. 
-संदीप शिंदे, प्रदेशाध्यक्ष, कामगार संघटना  

संपादन-भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com