दसवेलच्या शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दसवेलच्या शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे : सलग तीन वर्षे दुष्काळ बँकेचे आणि खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून दसवेल येथील तरुण शेतकरी किशोर भगवान पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. दोन दिवसांपासून हिरे महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

दसवेल (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी  किशोर भगवान पाटील (वय 38) यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी त्याला भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यलयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. किशोर अल्प भूधारक शेतकरी होता. त्याच्यावर बँकेचे 1 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज होते. तसेच खासगी सावकारांचेदेखील कर्ज होते.आईला दोन वर्षांपासून कॅन्सर आहे. वडिलांना दमा आहे. किशोर यांना एक मुलगा असून तो अपंग आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या किशोर यांना हा भार सोसवत नसल्यामुळे आत्महत्या करत जीवन संपवले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shetkari susaeet