esakal | पक्षघाताच्या झटक्‍यामुळे होते रूग्‍णालयात; त्‍यांच्या मागे चोरट्यांनी साधला डाव
sakal

बोलून बातमी शोधा

night home cash jwelarry robbery

मुलीला नवीन घर घेण्यासाठी मदत म्‍हणून देण्यासाठी असलेले तीन लाख रुपये रोख व सोन्याची अंगठी, गोफ असे सोन्याचे दागिने तसेच २१ इंची एलईडी टीव्ही असे ऐकून सुमारे पाच लाख रुपयांचा माल चोरट्याने चोरून नेला असून घटनास्थळी ठसे तज्ञ व डॉग स्कॉड बोलवण्यात आले.

पक्षघाताच्या झटक्‍यामुळे होते रूग्‍णालयात; त्‍यांच्या मागे चोरट्यांनी साधला डाव

sakal_logo
By
जितेंद्र मेखे

शिंदखेडा : येथील बसस्थानकसमोर सरस्वती कॉलनीतील रहिवाशी अभिमन आनंदा भामरे यांच्या बंद घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपाट तोंडून तीन लाख रोख रकमेसह सोने व एलइडी टीव्ही असा लाखोंचा ऐवज चोरट्याने लांपास केला. सदर घटना सकाळी शेजारी राहणारे विजय माळी यांच्या लक्षात आल्‍यानंतर त्यांनी भामरे यांच्या मुलांना याबाबत माहिती दिली.

श्री. भामरे यांनी मुलीला नवीन घर घेण्यासाठी मदत म्‍हणून देण्यासाठी असलेले तीन लाख रुपये रोख व सोन्याची अंगठी, गोफ असे सोन्याचे दागिने तसेच २१ इंची एलईडी टीव्ही असे ऐकून सुमारे पाच लाख रुपयांचा माल चोरट्याने चोरून नेला असून घटनास्थळी ठसे तज्ञ व डॉग स्कॉड बोलवण्यात आले. डॉग स्कोडने घरापासून पूर्वेला शंभर ते दीडशे मीटर अंतरावरील रस्त्यापर्यंत गेले. त्यानंतर ते थांबले. शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे हवालदार आबा भिल हे सकाळपासून घटनास्थळी दाखल होते पंचनाम्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

रूग्‍णालयात होते दाखल
सरस्वती कॉलनीत रहिवासी अभिमन भामरे राहतात. त्यांचे दोन्ही मुले नोकरीसाठी पुण्यात असतात. १७ सप्टेंबरला श्री. भामरे यांना पक्षघात झाल्याने ते धुळे येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. हीच संधी चोरट्यांनी साधून १८ व १९ च्या रात्री घराच्या मागील दराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यात त्यांनी लोखंडी कपाट तोडून त्यात मुलीला नवीन घर घेण्यासाठी तीन लाख रुपये ठेवलेले होते. तसेच सोन्याच्या चार अंगठी व सोन्याचा गोप १३ ग्राम असे ऐकूण सुमारे सोने तीन तोळे ८०० मिली व २१ इंची एलइडी टीव्ही असें ऐकून सुमारे पाच लाखाची चोरी झाल्याचे अभिमान भामरे यांचे चिरंजीव योगेश भामरे यांनी दिली 

शेजारील महिला कपडे टाकण्यास गेली अन्‌
सकाळी शेजारी राहणारे माळी कुटुंबातील महिला गच्चीवर कपडे वाळत टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना कपडे टाकण्याचा तार दिसला नाही. त्यांनी वरून शेजारी खाली बघितले असता त्यांना भामरे यांचा मागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लगेच भामरे यांचे चिरंजीव योगेश व भारत यांच्याशी दूरध्वनीने माहिती दिली. त्यानुसार त्यांनी कॉलनीत राहणारे प्रा. सतीश पाटील व आर. एच. भामरे यांना सदर माहिती दिली. त्‍यांनी पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळानंतर मुलगा योगेश आल्याने घरातून रोख रक्कम व सोने चोरी झाल्याचे लक्षात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे