शिंदखेड्यात गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याची नजर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

शिंदखेडा शहरात आता पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे करडी नजर असणार आहे. "कोरोना'चा संसर्ग होऊ नये, यासाठी संचारबंदी लागू आहे. नगरपंचायत, तहसील व पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शिंदखेडा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 50 दिवसांपासून राज्यात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउन काळात शासनाने दिलेले नियम काही नागरिक पाळत नसल्याने गर्दीच्या ठिकाणी शहारात ड्रोन कॅमेराद्वारे नजर असणार आहे. 
येथील वरपाडा चौफुलीवर शिवाजी चौकात ड्रोन कॅमेऱ्याचे उदघाटन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते झाले. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, हवालदार मनोज दाभाडे, कैलास महाजन, मंडलाधिकारी पंडित दावडे, प्रशांत माडे आदी उपस्थित होते. 

शिंदखेडा शहरात आता पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे करडी नजर असणार आहे. "कोरोना'चा संसर्ग होऊ नये, यासाठी संचारबंदी लागू आहे. नगरपंचायत, तहसील व पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थिती शहरात काही ठिकाण नागरिक अनावश्‍यक गर्दी करताना दिसतात. या गर्दीच्या ठिकाणी शिंदखेडा पोलिसांतर्फे ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. अनावश्‍यक गर्दी व नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक तिवारी यांनी सांगितले  कोविड-19 च्या विषाणूपासून वाचण्यासाठी एकमेव उपाय घरात थांबणे आहे, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन तहसीलदार सोनवणे यांनी केले. 

कडक कारवाईचा इशारा 
संचारबंदीच्या काळात लोक रस्त्यावर निघत असल्याचा तक्रारी असून, अशा लोकांवर करडी नजर ठेवण्यासाठी आता प्रत्येक गल्ली बोळात, चौकाचौकांत, रस्त्यावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कायदा न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda police department droan camera