जमीन संपादनात ' हेराफेरी '! 185 शेतकरयांना दिल्या तहसीलदारांनी नोटीसा 

विजयसिंह गिरासे 
Thursday, 14 January 2021

भुमी कार्यालया मार्फत होणारी संयुक्त मोजणी व कृषी विभागा मार्फत होणाऱ्या मुल्याकन अहवालात झाडे दाखवून शासनाची मोठी आर्थिक लुट फसवणुक करण्यात आली.

चिमठाणे : सुलवाडे- जामफळ- कानोली योजनेसाठी सोंडले (ता.शिंदखेडा) गावशिवरातील जमीन संपादनात जिरायत शेतीला बागायती दाखवून तलाठी किशोर नेरकर याने 185 शेतकरयांची जिरायत जमीन फळबागा दाखवून शासनाची फसवणूक करून तलाठी नेरकर यांच्यासह शेतकरयांनी स्व:ताच्या फायद्यासाठी शासनाची फसवणूक केली म्हणून तहसीलदार सुनील सैदाणे यांनी नोटीस बजवून कार्यवाईचे संकेत दिल्याने खळबळ उडाली आहे. 

आवश्य वाचा-  'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा ! 

सोडले येथील सुलवाडे - जामफळ - कनोली सिंचन प्रकल्पासाठी संपादित होणारया शेतजमीनीतील गटांच्या 7/12 वर पिकपेरणी फळबाग लागवडीची बनावट पिकपाहणी नोदी घेतल्या . शेतजमीनीतील संयुक्त मोजणी पत्रकात व मुल्यांकनात मोठया प्रमाणात आर्थिक अनियमीततेची तक्रारीनुसार डांगुर्णे सजातील सोंडले गावाचे तलाठी किशोर नेरकर यांचे दप्तरांची तपासणी केली असता .माागील वर्षाचे जिरायती शेतीवर बागायतीचे नोंद करून डाळींब, आंबे व इतर फळांचे लागवडीच्या नोंदी 7/12 वर वेगवेगळया पेनाने व हस्ताक्षराने नोंदी घेतल्याचे दिसुन आले आहे.सदरच्या नोदी या भूसंपादित क्षेत्रात होणारया 7/12 उताऱ्यावर घेण्यात आलेल्या आहेत. सदर नोंदी घेण्याचा उद्देश हा गुंतवणुकदारांनी केलेली फळ लागवडची रोपांचे वय एक ते चार वर्षाचे लागवड दाखवण्याकामी शिंदखेडा येथील कृषी विभाग, शिंदखेडा येथील अधिक्षक भूमी अभिलेख व गुंतवणुकदाराला म्हणजे आर्थिक फायदा या उद्देशाने दिसुन आला आहे.

आवश्य वाचा- मृत गर्भ काढल्‍यानंतर महिलेचे जगणेही नव्हते शक्‍य; अनेक डॉक्‍टरांचा होता नकार पण

2016-17 व 2017-18 या वर्षांचे Images चे अवलोकन केले असता सदर गटात खरीप पिकांचे उत्पादन घेतल्याचे दिसून येते व इतर कालावधीत शेत स्पष्टपणे पडीत दिसुन येते . तसेच मुल्यांकनाच्या वेळचे Video Shutting पाहिले असता सदर गटात रोपे आढळून आलेले आहेत. याचाच अर्थ सदरची फळबागाची लागवड 2019 मध्ये करण्यात आलेली आहे . आपण सदरच्या नोंदी या गुंतवणूक दाराला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या आहेत.
 

हेही वाचा- बिबट्याच्या जबड्यात होती बालिका; आरडाओरड केली आणि
 

शेतजमीनीमध्ये फळझाडांची लागवड प्रत्यक्ष रोपे असतांना त्यास उपअधिक्षक भुमी कार्यालया मार्फत होणारी संयुक्त मोजणी व कृषी विभागा मार्फत होणाऱ्या मुल्याकन अहवालात झाडे दाखवून शासनाची मोठी आर्थिक लुट फसवणुक करण्याकामी आपण शासकीय अभिलेखात चुकीच्या नोंदी घेवुन गुतवणुकदाराला आर्थिक फायदा होईल. शासनाला आर्थिक नुकसान होईल या प्रकाराचे कृत्य आपण केले आहे.सदर कामात आपण आपला खासगी सहाय्यक कैलास रघुनाथ मोरे (रा.डांगुर्णे) यांच्या सहाय्याने बनावट पिकपाहणीची नोंद घेतल्याचे निदर्शनास आले आहे.असे तहसीलदार सुनील सैदाणे यांनी तलाठी किशोर नेरकर यांना दिलेल्या नोटीसत म्हटले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkhede dhule corruption farmers notice land acquisition scheme