esakal | कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..
sakal

बोलून बातमी शोधा

Fish

कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : कसोशीने पाळलेला श्रावण महिना संपण्यास अवघे दोन दिवस उरले असतांना रस्त्याच्या पलिकडे पसरलेली मासळी पाहून त्यांचा धीर सुटला. श्रावण गेला खड्ड्यात म्हणत मासळीने (Fish) भरलेली खोकी पळवण्याची स्पर्धा सुरू झाली. हा प्रकार पाहून महामार्गावर (Highway Accident) ये-जा करणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली.

Fish

Fish

हेही वाचा: नाही भाव अंगी भूषण मिरवीतो जगी !

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चोपडा फाट्याच्या उड्डाणपुलाजवळ शनिवारी (ता.4) पहाटे पाचला ट्रक (एमएच 43, बीजी 6399) गतिरोधकावर नियंत्रण सुटून उलटला. खोपोली येथून इंदोरला वाहून नेण्यात येत असलेल्या मासळीने भरलेली थर्माकोलची खोकी रस्त्याच्या बाजूला कपाशीच्या शेतात फेकली गेली.

हेही वाचा: पीक विमाची भरपाई न देणाऱ्या पाच बँकांवर गुन्हा दाखल

Fish

Fish

मासे दिसताच एकच धमाल..

अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमली. त्यातील काहींची नजर मासळीवर गेली आणि मग एकच धमाल उडाली. लुंगी, शर्ट, खिसा, पिशवी, दुचाकीची डिकी जिथे जागा मिळेल तिथे मासळी कोंबून पळवण्यात आली. अपघातग्रस्त वाहनाचा चालक मात्र हताशपणे ही लूट बघत होता. सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, हॉटेल साहसचे संचालक मयूर राजपूत आदींनी घटनास्थळी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली. महामार्गावरून वाहतूक करणारे प्रवासी मात्र श्रावणातील ही सामिष लूट पाहून स्वतःचे मनोरंजन करून घेत होते.

loading image
go to top