esakal | अंजनी प्रकल्पातील जलसाठा ४४ टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Anjani Dam

अंजनी प्रकल्पातील जलसाठा ४४ टक्क्यांवर

sakal_logo
By
अल्हाद जोशी


एरंडोल : पळासदड (ता.एरंडोल) येथील अंजनी नदीवरील अंजनी प्रकल्पातील (Anjani Dam) जलसाठा ४४ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांच्या प्रयत्नांमुळे गिरणा नदीच्या पात्रातून वाहून जाणे पाणी अंजनी प्रकल्पात जामदा डाव्या कालव्याद्वारे सोडले जात असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ होत आहे.प्रकल्पात पाण्याचा प्रवाह अशाच वेगाने सुरु राहिल्यास प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: हतनूर धरणातून ७६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारापळासदड येथील अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात ऑगस्ट अखेरपर्यंत वाढ न झाल्यामुळे तालुक्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात होती.अंजनी प्रकल्पाच्या वर चौदा बंधारे असल्यामुळे सदरचे बंधारे भरल्याशिवाय प्रकल्पात जलसाठा होण्यास अनेक अडचणी निर्माण होत असतात. प्रकल्पावरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून प्रकल्पात प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा मार्ग पूर्ण मोकळा झाला आहे. तालुक्यात तसेच अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात मागील आठ दिवसांपासून समाधानकारक पाउस पडत असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गिरणा नदीच्या पात्रातून वाहून जाणे पाणी अंजनी प्रकल्पात जामदा डाव्या कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात यावे अशी सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी पाटबंधारे विभागास केली होती.पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार जामदा डाव्या कालव्यातून अंजनी प्रकल्पात पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: केळी वाहतुकीतून रेल्वेला 19 कोटी रुपये उत्पन्न

पाणी टंचाईची समस्या दूर

सद्यस्थितीत प्रकल्पात रोज सुमारे पन्नास क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे.अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत असल्यामुळे निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे.प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यास काळ्या बांधाऱ्याच्या माध्यामातून सिचानासाठी पाणी सोडण्यात येते.प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ होत असल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.मागील दोन वर्षापासून प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: बंधारा फोडण्यापर्यंत वाळूचोरट्यांची मजल!

शेतकरी चिंताग्रस्त

तालुक्यात सुमारे एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.मागील आठ दिवसापासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पाउस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.सद्यस्थितीत मुग व उडीद या कडधान्याची काढणी सुरु असून शेतकरी पिकांच्या अंतर्गत मशागतीच्या कामात आणि पिकांना खाते देणे व कीटक नाशक औषधांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत.

loading image
go to top