esakal | ४४ लाखाचा गुटखा, सिगारेट जप्त; मुंबई- आग्रा मार्गावर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

police

शिरपूर शहरालगतून गेलेल्‍या मुंबई- आग्रा महामार्गावरून मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. गुटखा, तंबाखू, गांजा यांची देखील छुप्या पद्धतीने वाहतुक सुरू असते. दरम्‍यान गुटख्याची अवैध वाहतुकी वाहतुक होत असल्‍याबाबतची टिप मिळाल्याने

४४ लाखाचा गुटखा, सिगारेट जप्त; मुंबई- आग्रा मार्गावर कारवाई

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादने आणि विदेशी सिगारेटची वाहतूक करणारा कंटेनर शहर पोलिसांनी जप्त केला. शहादा फाट्यावर केलेल्या कारवाईत गुटखा, सिगारेटचा साठा व कंटेनर मिळून एकूण ४४ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. 

आवर्जुन वाचा : डॉक्‍टर असूनही तो करायचा असला प्रकार...याकरीता पत्‍नीला संपविले

शिरपूर शहरालगतून गेलेल्‍या मुंबई- आग्रा महामार्गावरून मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. गुटखा, तंबाखू, गांजा यांची देखील छुप्या पद्धतीने वाहतुक सुरू असते. दरम्‍यान गुटख्याची अवैध वाहतुकी वाहतुक होत असल्‍याबाबतची टिप मिळाल्याने पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, परिविक्षाधीन उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, उपनिरीक्षक सागर आहेर यांनी महामार्गावर वाहने अडवून तपासणीला सुरवात केली. 

प्लास्‍टीकच्या गोण्यांमध्ये होता साठा
गुटखा घेवून जाणारा कंटेनर (आरजे ५२ जीए ३६३१) ला थांबवून झडती घेतल्यावर त्यात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केलेल्या प्लास्टिकच्या गोण्या आढळल्या. पोलिसांनी संशयित चालक बरकत अली इन्साफ अली (२८, उत्तरप्रदेश) याला अटक केली. शहर पोलिस ठाण्यात कंटेनर आणल्यानंतर मुद्देमालाची मोजणी करण्यात आली. वाणी प्रीमिअम कंपनीचा गुटखा, आय १० व एस्से नामक ‘कोरियन’ कंपनीच्या सिगारेटची खोकी, जाफरानी जर्दा असा तंबाकूजन्य पदार्थांचा साठा व कंटेनर मिळून ४४ लाख ८४ हजार २६० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच संशयित चालकाला अटक करण्यात आली. कारवाईत हवालदार उमेश पाटील, समीर पाटील, संदीप रोकडे, भरत चव्हाण आदिंनी सहभाग घेतला. 

संपादन : राजेश सोनवणे


 

loading image