शिरवाडे वणी फाटयाजवळ क्रुझर-बसमध्ये अपघात,सहा ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पिंपळगावं बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी जवळ क्रुझर व बसच्या भिषण अपघातात सहा जण मृत्यूमुखी पडले. यात पाच महिला व एका पुरुषांचा समावेश आहे. अपघातात आठ जण जखमी झाले असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्वजण किकवारी(ता.सटाणा),कळवण परिसरातील आहेत. 

पिंपळगावं बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी जवळ क्रुझर व बसच्या भिषण अपघातात सहा जण मृत्यूमुखी पडले. यात पाच महिला व एका पुरुषांचा समावेश आहे. अपघातात आठ जण जखमी झाले असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्वजण किकवारी(ता.सटाणा),कळवण परिसरातील आहेत. 

हदय पिळवटुन टाकणार्या किकांळ्या,हंबरडा फोडुन रडणारे स्वकिय,अाक्रोशा व डोळ्यातुन न थाबणारे अश्रु असे वेदनादायी चित्र पिंपळगावं शहरात अाज होते.मुबई अाग्रा महामाहार्गावरील शिरवाडे वणी जवळ झालेल्या भिषण अपघातील मुतांच्या नातलगांच्या किकाळ्यांनी अवघे पिंपळगावं शहर हादरून गेले. अपघातुन घडलेल्या मुत्युच्या तांडव अंगावर शहारे अाणणारे ठरले.

   विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या किकवारी(ता.सटाणा)येथील नागरिकांना इच्छीत स्थळी पोहचण्या अगोदर मुत्युने गाठले.या दुर्दवी घटनेत पिंपळगावंचे नागरिक व सोयीसुविधा धावुन अाल्या.दुर्घटनेची माहीती मिळताच रूग्णवाहीकेचे चालक प्रकाश पावले यांनी तात्काळ अपघात स्थळ गाठले.

सुन्न करणारे वातावरण

    रूग्णवाहीकेच्या सायरनच्या अावाजाने शहर दणाणुन सोडले. जखमी व मुतांना पिंपळगांवचे प्राथमिक अारोग्य केद्र,धन्वंतरी हॉस्पीटल व राधाकृष्ण हॉस्पीटल मध्ये दाखल केले.मुताचा अाकडा वाढत राहील्याने जखमीच्या ही नातलगांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
प्राथमिक अारोग्य केद्रांत मुतांचे शव अाणले गेले.यावेळी मुताच्या नातलगांचा हुंदके थांबता थांबत नव्हते.पिंपळगावच्या किसान ब्लोअर्सचे संचालक सचिन काकुळते यांच्या मातोश्री अपघातांत गमावल्याने त्यांच्या शोक अनावर झाला.

   इतर मुताचे कुटुबिय ढायमोकुल रडत होते. पिंपळगावं शहरावर दुखाची झालर पसरली.नातलगांना धीर देण्यासाठी पिंपळगावं शहरातील नागरिक धावले.मदत कार्य वेगाने सुरू होते. माजी सरपंच भास्करराव बनकर,पंचायत समिती सदस्य राजेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर,किरण लभडे यांनी अारोग्य केद्रांत येऊन विचारपुस केली.अारोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश धनवटे,डॉ.काळे यांनी शवविच्छेदन केले.

 

Web Title: marathi news shirwade vani accident-6 dead