महापालिकेत सत्तास्थापनेची शिवसेनेला संधी , कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अपक्षांची मदत शक्‍य 

residentional photo
residentional photo

नाशिक : विधानसभा निवडणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचीदेखील सत्तेची गणिते बदलण्याची शक्‍यता आहे. राज्यात महायुतीची म्हणून सत्ता स्थापन झाली तरी स्थानिक पातळीवर मात्र महायुती कितपत रुजेल याबाबत साशंकता आहे. नाशिक महापालिकेचा विचार करता डिसेंबरमध्येच होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे व अपक्षांच्या सहाय्याने सत्ता काबीज करता येणे शक्‍य असल्याने त्यादृष्टीने आतापासूनच भाजपकडून सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 
     महापालिकेत भाजपचे 66 सदस्य आहेत. त्यातील सरोज अहिरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने एकने संख्या घटली आहे. दिलीप दातीर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ 35 वरून 34 वर आले आहे. भाजपकडे सत्तास्थापनेसाठी अद्यापही पुरेसे संख्याबळ असले तरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी करत ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधलेल्या बाळासाहेब सानप यांचे भाजपमध्ये समर्थक नगरसेवकांची संख्या मोठी आहे. सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र हेदेखील नगरसेवक आहेत. भाजपमधील किमान दहा नगरसेवक सानप यांच्या पाठीशी उभे राहू शकतात. असे झाल्यास शिवसेनेला चाल देऊन भाजपची सत्ता उलथवता येणे शक्‍य असल्याने त्यादृष्टीने महापालिकेच्या राजकारणाकडे आता पाहिले जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडे सध्या 34 नगरसेवक आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, अपक्ष मिळून 22 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 61 नगरसेवकांची आवश्‍यकता असल्याने सानप यांच्या माध्यमातून ती भर भरून काढता येऊ शकते, असा कयास लावला जात आहे. 

राज्यातील सत्तेवर गणिते अवलंबून : 
राज्यात महायुतीची सत्ता आली तर शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील वाटा मागितला जाणार आहे. भाजपने शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य केला नाही तरी किंवा राज्यात वेगळी सत्तेची गणिते जुळली तरी महापालिकेमध्ये सत्ता बदल करता येणे शक्‍य असल्याने त्यादृष्टीने सत्तेची गणिते जुळविण्याचे प्रयत्न होताना दिसत आ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com